घरमुंबईआंबेडकरांनी मांडला पुन्हा ठाकरे- वंचित युतीचा डाव

आंबेडकरांनी मांडला पुन्हा ठाकरे- वंचित युतीचा डाव

Subscribe

वंचित व ठाकरे गट पालिका निडवणूक एकत्र लढवेल. या युतीत राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेसला सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. वंचितला सोबत घेण्यास राष्ट्रवादीचा विरोध आहे. काॅंग्रेसचाही वंचितसाठी दबक्या आवाजात नकार आहे. गरीब मराठा सत्तेत यावा, असे राष्ट्रवादीला वाटत नाही. मात्र ठाकरे गट व आमचा पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय आम्हाला फक्त जाहीर करायचा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

मुंबईः वंचित बहुजन आघाडी व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महापालिका निवडणूक एकत्र लढवणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी सांगितले.

ते म्हणाले, वंचित व ठाकरे गट पालिका निडवणूक एकत्र लढवेल. या युतीत राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेसला सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. वंचितला सोबत घेण्यास राष्ट्रवादीचा विरोध आहे. काॅंग्रेसचाही वंचितसाठी दबक्या आवाजात नकार आहे. गरीब मराठा सत्तेत यावा, असे राष्ट्रवादीला वाटत नाही. मात्र ठाकरे गट व आमचा पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय आम्हाला फक्त जाहीर करायचा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. यावर अजून ठाकरे गटाच्या एकाही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की वंचितला सोबत घेऊन पालिका निवडणुकीला सामोरे जाणार हे बघावे लागेल.

- Advertisement -

गेल्यावर्षी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. त्यावेळी ठाकरे यांनी देशातील लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला वंचितने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर या दोन नेत्यांमध्ये युतीबाबत चर्चाही झाली. वंचितने युतीसाठी होकारही कळवला. या बाबतीत शिवसेनेकडून निर्णय आल्यानंतर आघाडीबाबत पुढच्या टप्प्याची चर्चा सुरू होईल, अशी माहिती वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली. मात्र ठाकरे गटाने युतीबाबत मौन बाळगले.

त्यानंतर भीम शक्ती व शिव शक्ती युतीबाबत अनेक तर्कवितर्क सुरु झाले. महाविकास आघाडीत वंचित सामील होणार व महाविकास आघाडी पालिका निवडणूक लढवणार अशीही चर्चा सुरु झाली. अजित पवार यांनीही वंचित आघाडीला सोबत घेण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. मात्र याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत पालिका निवडणुकीसाठी युती झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ठाकरे गट यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -