शिवसेनेने नोटीस पॅटर्न राबवायला सुरुवात केली – प्रवीण दरेकर

नारायण राणे, मोहीत कंबोज, रवी राणा यांना नोटीसा पाठवणाऱ्या महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई होत असताना आम्हीही काही कमी नाही असे दाखवत या नोटीसा पाठवल्या जात आहेत.

Praneen Darekar criticizes Shiv Sena over Rana's action
Praneen Darekar criticizes Shiv Sena over Rana's action

शिवसनेने नोटीस पॅटर्न राबवायला सुरू केला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. ते रवी राणा यांच्या घरी पाठवण्यात आलेल्या महापालिकेच्या नोटीशीनंतर बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य शासनाप्रमाणे महापालिकेच्या यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेवर केला असून अशा नोटिसींना भाजप भीक घालत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

व्यक्तिगत स्तरावर कावाई करण्याचे काम सुूड भावनेने सुरू आहे. नारायण राणे, मोहीत कंबोज, रवी राणा यांना नोटीसा पाठवणाऱ्या महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई होत असताना आम्हीही काही कमी नाही असे दाखवत या नोटीसा पाठवल्या जात आहेत. या सगळ्या नोटिसींना उत्तर दिले जाईल कारण या सर्वांनी परवानगी घेऊन बाधकाम केले आहे. तथापी त्रास द्यायचा छळ करायचा आणि आपल्या हाती असलेल्या राज्य शासनाच्या यंत्रणा जशा आपण वापरतो, तशा महापालिकेच्या यंत्रणा वापरायच्या अशा प्रकरची रणनीती सुरू आहे. मात्र, भाजप त्याला भिकही घालत नाही. मात्र, दुसऱ्याला बोलत असताना स्वत: सुड भावनेने कारवाया करणे सुरू आहे.  तुम्ही नोटीसा पाठवता तर तुमचे अधिकारी झोपले होते काय? तुमची यंत्रणा काय करत होती?  तुम्ही कशा काय नोटीसा पाठवू शकता? असा सवाल करत केवळ सुड भावनेने केली गेलेली कारवाई आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.