घरमुंबईउल्हासनगरच्या प्रांजल पाटील बनल्या पहिल्या अंध IAS अधिकारी

उल्हासनगरच्या प्रांजल पाटील बनल्या पहिल्या अंध IAS अधिकारी

Subscribe

अंगात हिंमत, जिद्द आणि एखादी गोष्ट मिळवण्याची चिकाटी असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे उल्हासनगरच्या प्रांजल पाटील. सहाव्या वर्षी दृष्टी गेलेल्या प्रांजलने आपल्या प्रयत्नांच्या जोरावर उपजिल्हाधिकारी पदावर शिक्कामोर्तब केला. प्रांजलने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत सोमवारी उपजिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारला. या यशामुळे प्रांजल भारतातील पहिला महिला आयएएस अधिकारी बनल्या आहेत.

प्रांजल यांची दृष्टी जन्मापासूनच अधू होती. पण, सहा वर्षांनंतर दृष्टी कायमची गेली. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. आपण काहीतरी करून मोठं नाव कमवायचं ही जिद्द कायमच होती. त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण दादरच्या कमला मेहता स्कूलमध्ये पूर्ण केलं. तिथेच ब्रेल लिपीमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर उल्हासनगरच्या चांदीबाई महाविद्यालयात आर्टस्मध्ये त्या बारावीत उत्तीर्ण झाल्या. त्यात त्यांना ८५ टक्के मार्क्स मिळाले होते. मग बी.ए. करण्यासाठी मुंबईतील सेंट झेव्हिअर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या सर्व प्रवासात प्रांजलचं अंधत्व कधीही मध्ये आलं नाही.

- Advertisement -

पदवीधर झाल्यावर प्रांजल पाटील यांनी यूपीएससी परीक्षा द्यायचा निर्णय घेतला. वाचलेल्या एका लेखातून प्रेरणा घेत आपण आयएएस व्हायचं हे मनाशी तेव्हाच पक्क केलं. पण, त्याबाबत कुणाजवळही त्यांनी वाच्चता केली नाही. पदवीधर झाल्यावर दिल्लीत जाऊन जेएनयू महाविद्यालयातून एम.ए.ही पूर्ण केलं. जीवतोड अभ्यास करून थेट यूपीएससीची परीक्षा दिली आणि या पहिल्या प्रयत्नातच त्या ७७३ व्या क्रमांकाने उत्तीण झाल्या. पुढील वर्षी आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करत प्रांजलने १२३ वा रँक पटकावला. आपल्या ट्रेनिंग दरम्यान एर्नाकुलमच्या असिस्टेंट कलेक्टर पदावरही त्यांनी काम केलं. केरळ कॅडरमध्ये नियुक्त होणाऱ्या प्रांजल या पहिल्या दृष्टिहीन आयएएस अधिकारी आहेत. प्रांजलच्या या धाडसी जिद्दीला सलाम.

हेही वाचा –

बंडखोर तृप्ती सावंत यांना शिवसेनेकडून अभय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -