घरमुंबईशिक्षकांच्या हक्कांसाठी सतत प्राणपणाने झटणाऱ्या प्रशांत रेडीज यांचे निधन

शिक्षकांच्या हक्कांसाठी सतत प्राणपणाने झटणाऱ्या प्रशांत रेडीज यांचे निधन

Subscribe

शिक्षकांच्या प्रश्नासाठी सत्ताधारी सरकारशी आघाडीवर राहून झुंज देणारे मुख्याध्यापक म्हणून रेडीज यांची ओळख होती.

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रेडीज यांचे गुरुवारी दु:खद निधन झाले आहे. प्रशांत रेडिज यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. मात्र नंतर त्यांना निमोनीया झाला होता. आजारादरम्यान त्यांची ऑक्सिजन पातळी कमी होत गेली. यानंतर त्यांना कांदिवली या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आजारादरम्यान त्यांचे निधन झाले. गुरुवारी रात्री ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली होती. यानंतर ११:३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वडील आणि तिघे भाऊ असा परिवार आहे. प्रशांत रेडीज शिक्षकांच्या हक्कांसाठी सतत प्राणपणाने झटत होते. मुंबईसह राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत असत. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा , त्यांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी ते दक्ष असत. त्यांच्या अकाली निधनाने चळवळीला धक्का बसला आहे.

शिक्षकांच्या प्रश्नासाठी सत्ताधारी सरकारशी आघाडीवर राहून झुंज देणारे मुख्याध्यापक म्हणून रेडीज यांची ओळख होती. त्यांनी २५ वर्षे अध्ययनाचे काम केले. ते १९९८पासून कांदिवली येथील हिल्डा कॅस्टोरिनो मराठी शाळेचे मुख्याध्यापक होते. तसेच, दोन दशकांपासून अधिक काळ शिक्षक चळवळीत कार्यरत आहेत. मराठी कायम विनाअनुदानित शाळांचा ‘कायम’ हा शब्द काढून त्यांना अनुदानास पात्र ठरवावे यासाठी त्यांनी तब्बल १७ वर्षे लढा दिला. शिक्षकच नव्हे; तर शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी, पालक यांच्या विविध प्रश्नांसाठी सतत झटणारा एक नेता गमावल्याची भावना मुख्याध्यापक संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली.

- Advertisement -

हे वाचा-RTPCR चाचणी अहवाल यापुढे मिळणार Whatsapp वर, उच्च न्यायालयाचा प्रयोगशाळांना आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -