घरमनोरंजनPrathamesh Parab Engagement : दगडूला मिळाली खरी प्राजू; अभिनेता प्रथमेश परबचा साखरपुडा

Prathamesh Parab Engagement : दगडूला मिळाली खरी प्राजू; अभिनेता प्रथमेश परबचा साखरपुडा

Subscribe

मुंबई : मराठी सिनेसृष्टीमध्ये काही दिवसांपासून कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत. गौतमी देशपांडे – स्वानंद तेंडुलकर, स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी, शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांचा नुकताच विवाह झाला. तर अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी देखील प्रेमाची कबुली दिली. या सगळ्यांमध्ये आता ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) याचाही समावेश झाला आहे. व्हॅलेंटाइन्स डे च्या मुहूर्तावर प्रथमेश आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर यांचा साखरपुडा झाला. लवकरच प्रथमेश लग्नबंधनात अडकणार आहे.

अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना हा सुखद धक्का दिला. व्हॅलेंटाईन्स डे हा प्रथमेशसाठी खास असून याबद्दल प्रथमेशनेच भाष्य केलं. त्यामुळे त्यांनी व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशीच साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

लगेच बोहोल्यावर चढणार

प्रथमेश परब आणि क्षितिजाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत साखरपुडा आणि लग्नाची तारीख जाहीर केली होती. 14 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचा साखरपुडा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच 10 दिवसांनी 24 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

- Advertisement -

प्रथमेशसाठी व्हॅलेंटाईन्स डे खास

व्हॅलेंटाईन डे अभिनेता प्रथमेश परबसाठी खूपच खास आहे. यासंदर्भात त्याने एक पोस्ट शेअर केली होती. त्याने लिहिलं होतं,’व्हॅलेंटाईन डेचं आमच्या नात्यात विशेष स्थान आहे. आम्ही व्हॅलेंटाईन डे वगैरे काही मानत नाही. पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टी खूप खास बनतात. 14 फेब्रुवारी 2020 रोजी मी क्षितिजाची व्हॅलेंटाईन डे स्पेशल सीरिज पाहिली आणि तिला मेसेज केला होता. 14 फेब्रुवारी 2021 रोजी आम्ही रिलेशनमध्ये आलो. 14 फेब्रुवारी 2022 रोजी आमच्या रिलेशनला एक वर्ष पूर्ण झालं. 14 फेब्रुवारी 2023 रोजी आम्ही आमचं रिलेशन सगळ्यांसमोर आणलं. त्यामुळे आम्ही 14 फ्रेब्रुवारी रोजी साखरपुडा करणार आहोत.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -