नवाब राहिला दूर आधी दाऊदचे बघा असे बोलण्याचे धाडस संजय राऊतच करू शकतात – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

Leader of Opposition Pravin Darekar criticized Sanjay Raut
Leader of Opposition Pravin Darekar criticized Sanjay Raut

मलिक यांचा थेट संबंध दाऊदशी प्रस्थापित झालाय. बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जागा घेतल्यायत, व्यवहार केलेत, हे कोर्टात सिद्ध झाले आहे. दाऊदशी संबंध प्रस्थापित झालेत अशा प्रकारचा मंत्री नवाब मलिक आज तुमच्या मंत्रिमंडळात आहे, याची लाज, शरम वाटत नाही. आणि नवाब राहिला दूर पहिले दाऊदचे बघा अशा प्रकारचे बोलण्याचे धाडस केवळ संजय राऊत करू शकतात, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.

दाऊद जीवंत आहे की नाही हे पाहा, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दाऊद जीवंत आहे की नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांच्यासारख्या जबाबदार खासदाराने करणे हे बरोबर नाही. संजय राऊत यांना दाऊद याच्याबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी. दाऊदला फरफटत आणण्याची ताकद नरेंद्र मोदी सरकारमद्धेच आहे. आणि त्यांनी ते दाखवून दिले आहे. ३७० कलम या देशात रद्द होऊ शकत नाही, रक्ताचे पाट वाहतील, असे बोलणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे. रक्ताचा एक थेंबही या देशात सांडला नाही. त्यामुळे ती क्षमता, धमक, ताकद मोदी सरकारमद्धेच आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. आपल्याला बोलण्याचा नैतिक अधिकार तेव्हाच निर्माण होईल, जेव्हा दाऊदशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी कराल. पहिले त्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा कारण तो दाऊदशी संबंधित आहे, हे सिद्ध झालेले आहे. म्हणजे आपले ठेवायचे झाकून आणि नको तो सल्ला देण्याचे काम संजय राऊत करतायत. लोकांना सर्व काही समजते, असे दरेकर यांनी सांगितले.