घरमुंबईवांद्रे भूखंड व्यवहाराची एसआयटी चौकशी करा, प्रवीण दरेकरांची मागणी

वांद्रे भूखंड व्यवहाराची एसआयटी चौकशी करा, प्रवीण दरेकरांची मागणी

Subscribe

वांद्रे येथील बँड स्टॅण्डजवळील भूखंड विक्रीच्या व्यवहाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. याबाबत दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. गुरुवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी या भूखंड विक्रीवरून सरकारला लक्ष्य करत चौकशीची मागणी केली होती.

वांद्रे पश्चिम येथील बँड स्टॅण्ड या उच्चभ्रू ठिकाणाजवळ ताज हॉटेलच्या शेजारी समुद्र किनारी मोक्याच्या ठिकाणी एक एकर 5 गुंठे शासकीय मालकीचा भूखंड आहे. हा भूखंड विकासकाला कवडीमोल किमतीत देण्यात आला असल्याचा आरोप प्रवीण दरेकर केला आहे. या विक्री व्यवहाराला स्थगिती देऊन या व्यावहाराची सआयटी चौकशी करावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

- Advertisement -

सन 1905 मध्ये एका धर्मादाय संस्थेला नर्सिंग होम बांधण्यासाठी हा भूखंड भाडेपट्ट्यावर देण्यात आला होता. मात्र, एवढ्या वर्षात संबंधित संस्थेने या जागेचा वापर केला नाही त्यामुळे हा भाडेपट्टा करार 1980 मध्ये संपला होता, असे दरेकरांनी म्हटले आहे. मुंबई विकास आराखडा 2034 नुसार या भूखंडावर Rehabilitation Centre असे आरक्षण दाखवण्यात आले आहे. विकास आराखड्यासाठी दाखवण्यात आलेल्या कारणासाठी या जागेचा वापर होणे आवश्यक होते. मात्र, संबंधित संस्थेने नियमबाह्य पद्धतीने हा भूखंड विकण्याची जाहिरात प्रसिद्ध केली असून शासनाने हा भूखंड विक्रीची परवानगी दिली असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -