घरमुंबईकोरोना रोखण्यात राज्य सरकार अपयशी, केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा - प्रवीण दरेकर

कोरोना रोखण्यात राज्य सरकार अपयशी, केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा – प्रवीण दरेकर

Subscribe

सर्वसामान्यांच्या रोजी रोटीवर परिणाम करणारी भूमिका खपवून घेणार नाही - दरेकर

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी राज्यात ३९ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. २२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्युदर १.९४ टक्के इतका आहे. देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटली असताना महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यात राज्य सरकार सपशेल फेल ठरले असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. कोरोनामुळे राज्याची परिस्थिती वाईट होत चालली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन परिस्थिती पुर्वपदावर आणावी असे विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

ठाकरे सरकारची जी भूमिका सर्वसामान्यांच्या रोजी रोटीवर परिणाम करेल अशी कुठलीही राज्य सरकारची भूमिका खपवून घेणार नाही. लसीकरणापासून ते कोविड केंद्रांपर्यंत आणि साहित्य पुरवण्यापासून सर्व यंत्रणा केंद्र सरकारने पुरविल्या आहेत. परंतु सर्व नियोजन पुर्णपणे या सरकारचे कोलमडलेले आहे. मग ते मॉनिटरिंग असेल मॅनेजमेंट असेल सर्व आघाड्यांवर हे सरकार फेल ठरले आहे याचे कारण त्यांच्या अंतर्गत कलह एवढा आहे की त्याच्यामध्येच ते पुर्णपणे बुडालेले आहेत. ज्या अर्थी नियोजन कोलमडले आहे याचा अर्थ सरकारमधील समन्वय आहे. यामुळे तिन्ही पक्षांच्या सातत्याने येणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे महाराष्ट्रातील जनता वाऱ्यावर पडल्याचे दिसते आहे. या सगळ्याची जबाबदारी राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना घ्यावी लागेल. परंतु कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री मौन धारण करुन बसले आहेत. हे अनाकलनीय आहे म्हणून सरकारने या सगळ्या गोष्टींचे गांभीर्याने विचार करावा किंबहूना एक गोष्ट निश्चित झाली आहे. देशातील इतर राज्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी ठरली असताना महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुले आपले सरकार पुर्णपणे फेल ठरले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारला, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला, आर्थिक आणि कृषी विभागाल विनंती करतो की महाराष्ट्राच्या परिस्थितीकडे लक्ष घालावे अशी विनंती करतो, कारण या सरकारचे आता सर्वसामान्य आणि महाराष्ट्राकडे लक्ष राहिलेलं नाही त्यांना फक्त सत्ता टिकवणे हेच लक्ष बनले आहे. म्हणून जनतेकडे लक्ष नसल्याने केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणावे अशी विनंती असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -