घरक्राइमMumbai Sakinaka Rape : दीशा, शक्ती कायदा कुठेय ? दरेकरांचा सवाल

Mumbai Sakinaka Rape : दीशा, शक्ती कायदा कुठेय ? दरेकरांचा सवाल

Subscribe

साकीनाका बलात्कार प्रकरणात मृत्यू पावलेल्या महिलेचा जीव पुन्हा येऊ शकणार नाही. ही अत्यंत ह्दयद्रावर अशी घटना आहे. या घटनेतील पीडित महिलेचा मृत्यू झाल्याचा मला चित्रा ताईंचा फोन आला. दीशा, शक्ती आणि फास्ट ट्रॅक कायदा कुठे गेला असा सवाल विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. सध्याचे कायदे अंमलात आणले तरीही अनेक गोष्टी होऊ शकतील. पण सरकारला फक्त राजकारण करायचे आहे. किमान अशा घटनेत तरी राजकारण नको असे आवाहन दरेकर यांनी केले आहे. तुम्ही जर अशा घटनांमध्येही राजकारण करणार असाल तर जो उद्रेक होईल तो सरकारला परवडणार नाही असाही इशारा दरेकर यांनी दिला. (Pravin darekar ask quetion to MVA government over women security)

बिहार, उत्तर प्रदेशची उदाहरण देताना आपल्या पायाखाली काय सुरू आहे, याचाही अंदाज घ्यावा असेही दरेकर म्हणाले. महिलांसोबत अशा घटना घडताना अशी विकृत मानसिकता कशामुळे होते, याचाही विचार व्हायला हवा.
हे करत असताना सरकार म्हणून आपण काय जबाबदारी पार पाडतोय हेदेखील सरकारने लक्षात घ्यायला हवे. शेकडोंच्या संख्येने महिला अत्याचाऱ्याच्या घटना घडत आहेत. पण साकीनाक्याची घटना ही परिसीमा करणारी अशी आहे. एकीकडे मुंबईला सुरूक्षित शहर म्हणून पाहिले जायचे. पण अशा घटनांमुळे शहराच्या वैभवाला डाग लागण्याचा प्रकार हा सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाल्याचे दरेकर म्हणाले. अशा घटनांचे कोणीही राजकारण करू नये असेही ते म्हणाले. सरकार आणि जनतेचा धाक राहिला नाही असेच या साकीनाक्याच्या घटनेतून समोर आले आहे.

- Advertisement -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर या संपुर्ण घटनेचे राजकारण करताना दिसत आहेत. पण अशा घटनांमध्ये राजकारण होते याची लाज लाटते, असे दरेकर म्हणाले. महाराष्ट्राची तुलना ही बिहार आणि उत्तर प्रदेशसोबत करताना महाराष्ट्रात काय घडत आहे हेदेखील तपासून पाहण्याची गरज असल्याचे दरेकर म्हणाले. साकीनाक्याच्या घटनेने मुंबईतील महिलांना शहर असुरक्षित वाटण्याची भावना निर्माण झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -