भविष्यात आरोग्य विभागातील भरतीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्राधान्य

MunicipalCorporation will get income from Mithi river development construction of hotels water sports
पालिकेला मिळणार उत्पन्न, मिठी नदी विकासकामातून हॉटेल्स, जलक्रीडा निर्मिती

मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव वाढलेला असताना त्यावेळी पालिकेच्या रुग्णालये, जंबो कोविड सेंटर आदी ठिकाणी आरोग्य विभागाच्या अंतर्गत नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण आणि मौलिक कामगिरी केली. याची दखल पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी घेतली आहे. भविष्यात पालिका आरोग्य विभागातील ३२ हजार रिक्त पदे भरताना सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करणार असल्याचे सूतोवाच आयुक्तांनी केले आहे.

मुंबई महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांची महत्वपूर्ण बैठक कोविडच्या प्रादुर्भावामुळे बंद पडलेली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक तब्बल २१ महिन्यांनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ऑनलाईन स्वरूपात पार पडली.

या बैठकीत, कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेप्रसंगी पालिका आरोग्य विभागावर डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांच्या कमतरतेमुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण पाहता भविष्यात रिक्त पदे भरताना कोविड काळात उत्तम कामगिरी केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय गटनेते यांनी व्यक्त केली. त्यावर पालिका आयुक्तांनी सकारत्मकता दर्शवत वरीलप्रमाणे सूतोवाच केले. त्यामुळे पालिकेत भविष्यात आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची भरती झाल्यास सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना नववर्षात नोकरीची लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत १०,८६० नव्या रुग्णांची नोंद