घरमुंबईकेईएम रुग्णालयात मुदतपूर्व जन्मणाऱ्या बाळांची संख्या अधिक

केईएम रुग्णालयात मुदतपूर्व जन्मणाऱ्या बाळांची संख्या अधिक

Subscribe

प्रिमॅच्युअर बाळाला भविष्यात अनेक शारिरीक आणि मानसिक समस्या उद्भवतात. या बाळांची रोगप्रतिकार शक्ती योग्य वेळी जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे या मुलांना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो.

परळच्या केईएम रुग्णालयात राज्यातील अनेक ठिकाणांहून प्रसूतीसाठी महिला दाखल होत असतात. सध्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे ग्रामीण किंवा शहरी भागातील गर्भवती महिलेच्या आरोग्य स्थितीवर मोठा परिणाम होतो. त्यातून अनेकदा प्रिम्यॅचुअर बेबी म्हणजेच मुदतपूर्व बाळ जन्माला येतात. गर्भवती महिलेचा आहार आणि तिच्या आरोग्यावर गर्भाची स्थिती अवलंबून असते. याचं प्रमाण सर्वच रुग्णालयांमध्ये सरासरी १० टक्के आहे. पण, केईएम या पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात सर्वात जास्त मुदतपूर्व बाळ जन्माला येत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र मुदतपूर्व बाळ जन्माला येण्याची स्थिती ही मातेच्या आरोग्य आणि आहार स्थितीवर अवलंबून असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

वर्षाला ३५ लाख मुदतपूर्व बाळांचा जन्म

केईएम रुग्णालयात महिनाभरात जन्माला येणाऱ्या ७५० नवजात बाळांपैकी जवळपास २०० मुदतपूर्व बाळ जन्माला येतात. त्यात १० ते २० टक्के प्रिम्यॅचुअर मुलांचे प्रमाण आहे. इतर रुग्णायांच्या तुलनेत केईएम रुग्णालयातील हे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. तर, शीव रुग्णालयात महिन्याला ६०० ते ७०० बाळांचा जन्म होतो. त्यात जवळपास १२ ते १४ टक्के प्रिम्यॅचुअर बाळांचं प्रमाण आहे आणि नायर रुग्णालयात जन्माला आलेल्या ४०० नवजात बाळांपैकी १५० हून अधिक बाळांना उपचारांसाठी एनआयसीयू म्हणजेच अतिदक्षता विभागात ठेवले जातं. तर, जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत पालिकेच्या केईएम, नायर आणि सायन अशा तीन मुख्य रुग्णालयांत २६४ नवजात शिशूंचे मृत्यू झाले आहेत. तर, मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांत ८ हजार ११० नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे. जगातील तुलनेत भारतात प्रिम्यॅचुअर बेबी जन्माला येण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. दरवर्षी जवळपास ३५ लाख मुदतपूर्व बाळ जन्माला येतात.

- Advertisement -

जन्मजात संसर्गामुळे नवजात शिशुंचा मृत्यू

पालिकेचे केईएम हे मुख्य रुग्णालयांपैकी एक मानले जाते. या रुग्णालयात २०१५ ते जून २०१८ कालावधीत १६४ नवजात शिशुंचे मृत्यू झाले. तर मुदतीपूर्व प्रसूतीच्या कारणामुळे ८५ नवजात शिशुंच्या मृत्यूची नोंद आहे. यात श्वसनाच्या त्रासामुळे १४ आणि जन्मत: न्यूमोनियाच्या संसर्गामुळे १२ जणांचा मृत्यू ओढावला आहे. नायर रुग्णालयात २०१५ ते जून २०१८ या काळात मुदतीपूर्व प्रसूतीच्या कारणामुळे २५२ शिशुंचे मृत्यू झाले आहेत. यात श्वसनाच्या त्रासामुळे १७७ आणि न्यूमोनियामुळे ८७ नवजात शिशुंच्या मृत्यूंची नोंद आहे. जन्मजात संसर्गामुळे ६३ नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे.

मुदतपूर्व बाळांची रोगप्रतिकारकशक्ती कमी

मुदतपूर्व जन्माला आलेल्या बाळाचं वजन हे मुदतपूर्ण झालेल्या बाळाच्या वजवापेक्षा कमी असते. त्यामुळे त्याची रोगप्रतिकारशक्ती देखील त्यामानाने कमी असते. योग्य पोषण आणि आहार न मिळाल्याने मुदतपूर्व बाळ जन्माला येतं आणि अशा बाळांना संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा मुलांच्या स्वच्छतेसाठी आणि काळजीसाठी केईएम रुग्णालयात World Premature Day म्हणजेच जागतिक मुदतपूर्व प्रसूती या दिनानिमित्त पॅम्पर्स या कंपनीने मिनी डायपर्सचे वाटप केले.

- Advertisement -

शारिरीक आणि मानसिक समस्या उद्भवतात

सामान्यतः मूल आईच्या गर्भात ३७ आठवडे राहतं. परंतु, ३७ आठवड्यांपूर्वीच प्रसूती झालेली मुले अपुऱ्या दिवसांची असतात. म्हणून त्यांना प्रिमॅच्युअर बेबी असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना भविष्यात अनेक शारिरीक आणि मानसिक समस्या उद्भवतात. या बाळांची रोगप्रतिकार शक्ती योग्य वेळी जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे या मुलांना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय, या मुलांना जन्मानंतरच्या काही दिवसात मानसिक आजार होण्याचा धोका असतो. नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच बाळाचा जन्म झाला तर त्याला भविष्यात मानसिक आजार होण्याचा धोका असतो. अशा मुलांना धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास जाणवू शकतो. फुप्फुसांची वाढ न झाल्याने मूल योग्य प्रकारे श्वास घेऊ शकत नाही. त्यामुळे सतत ऑक्सिजन पुरवावे लागते. शरीरातल्या सर्वच अवयवांचे काम कमी होऊन मृत्यू होऊ शकतो. शिवाय, अशा मुलांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे या मुलांना शिरेतून ग्लुकोज देऊन साखरेचे प्रमाण राखावे लागते. अन्यथा मेंदूवर आणि इतर संस्थांवर कायमचे वाईट परिणाम उद्भवू शकतात.

“एनआयसीयू वॉर्डमध्ये ३० दिवसांच्या बाळाला ठेवले जाते. त्यामुळे या बाळांची स्वच्छता राखणे सर्वात महत्त्ताचं असतं. कारण, त्यांची प्रतिकारशक्ती आणि वजन तुलनेने कमी असते. वेळे आधी जन्माला आलेल्या मुलांच्या सभोवतालचा परिसर फार स्वच्छ ठेवावा लागतो. या स्वच्छतेचा भाग म्हणजे तोंडातून लाळ, घाम, विष्ठा, मूत्र यातून परिसरात संसर्ग निर्माण होत असतो. या लहान बाळांना डायपर्स लावणे कसोटीचे काम आहे. हे डायपर्स देण्याचे काम काही संस्था करतात. मिनी डायपर्सचा वापर झाल्यानंतर स्वच्छता वाढेल. त्यांना संसर्ग होणार नाही. हे डायपर्स वापरण्याचे प्रशिक्षण आया, नर्सेसना देण्यात येणार आहे.” – डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -