घरमुंबईपाणी गळती वेळेत रोखल्याने कोट्यवधी लिटर पाण्याची बचत

पाणी गळती वेळेत रोखल्याने कोट्यवधी लिटर पाण्याची बचत

Subscribe

शिवडी परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला काही दिवसांपूर्वी लागलेली मोठी गळती जल अभियंता खात्याच्या अभियंता व कर्मचारी यांनी अथक प्रयत्नांनी वेळीच रोखल्याने कोट्यवधी लिटर पाणी वाया जाण्यापासून वाचले आहे.
शिवडी परिसरातील ‘टनेल शाफ्ट’ (गाडी अड्डा टनेल) येथे भंडारवाडा जलाशय, गोलंजी हिल जलाशय व फॉसबेरी जलाशय, या तीन जलाशयांना पाणीपुरवठा करणाऱ्या महत्वाच्या जलवाहिनील काही दिवसांपूर्वी मोठी गळती लागली होती.

सध्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर ही गळती दुरुस्त करणे हे एक मोठे आव्हानच होते.
मात्र, जलअभियंता व जलकामे विभागाच्या अभियंता व कर्मचारी यांच्या पथकाने युद्धपातळीवर या गळती लागलेल्या जलवाहिनीची अवघ्या अडीच तासात दुरुस्ती केल्याने पाणी गळतीपोटी वाया जाऊ शकणाऱ्या कोट्यवधी लिटर पाण्याची बचत झाली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे कोणत्याही भागाचा पाणीपुरवठा बंद न करता हे काम कौशल्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले आहे. हे काम अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात आणि उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक अभियंता (जलकामे) (तातडीचा दुरुस्ती विभाग) जीवन पाटील यांच्या पुढाकाराने यशस्वीरित्या पार पाडण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -