एपीएमसीत भाज्यांची आवक घटल्याने दर वधारले, अतिपावसाचा फटका

APMC MARKET

वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात पावसामुळे भाज्यांची आवक घटली आहे. तर सततधार सुरु असणाऱ्या पाऊसामुळे भाज्या खराब होण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भाजीच्या दरात वाढ झाली आहे. काही फळभाज्याचे दर देखील वाढले आहेत.  एपीएमसी मार्केट मध्ये पुणे, नाशिक येथून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो. मात्र, त्या ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. पाऊसामुळे भाज्या खराब होण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. भाज्या खराब होत असल्यामुळे दरात देखील वाढ झाली आहे.

महिनाभराच्या तुलनेत मेथीच्या दरात चार रुपयांनी वाढ झाली आहे. तर पालक, कोथीबरचे देखील दर वाढले आहेत. मात्र, शेपूचे दर स्थिर आहेत. हिरवी मिरचीच्या रात दहा रुपयांनी घसरण झाली आहे. मात्र, वाटाणाच्या दरात वाढ झाली आहे. भेंडी, गवारच्या दरात वाढ झाली असून भेडीचे दर हे 20 रुपये किलोने वाढले आहे. तर गवार देखील वीस रुपयांनी वाढली आहे. फरसबीच्या देखील दरात तीस रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, टॉमेटोच्या दरात पंधरा रुपयांची घसरण झाली आहे. ढोंबळी मिरची व कोबीचे भाव मात्र स्थिर आहे.

डिझेलच्या वाढत्या किंमती मुळे ट्रान्सपोर्ट महागला आहे. त्यातच पाऊस सुरु असल्यामुळे भाज्या खराब होण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे.
शंकर पिंगळे, भाजीपाला विक्रेता

21 जुलै  2022                   21 जुन 2022

मेथी            14 ते 16 रुपये जुडी                10 ते 14 रुपये जुडी

शेपू             10 ते 16 रुपये जुडी                10 ते 16 रुपये जुडी

पालक           9 ते 10 रुपये जुडी                 6 ते 7 रुपये जुडी

कोथिंबर          16 ते 20 रुपये जुडी             14 ते 18 रुपये जुडी

हिरवी मिरची      30 ते 40 रुपये किलो            40 ते 55 रुपये

वाटणा             70 ते 100 रुपये किलो          60 ते 110 रुपये

भेंडी               60 ते 90 रुपये किलो            40 ते 48 रुपये

गवार              50 त 90 रुपये किलो            38 ते 48 रुपये

घेवडा             40 ते 60 रुपये किलो             40 ते 50 रुपये

फरसबी          70 ते 100 रुपये किलो             40 ते 60 रुपये

वांगी              18 ते 24 रुपये किलो               16 ते 20 रुपये

टॉमटो            18 ते 20 रुपये किलो                35 ते 45 रुपये

कोंबी             12 ते 20 रुपये किलो                14 ते 20 रुपये

ढोबळी मिरची    40 ते 50 रुपये किलो               38 ते 45 रुपये