Homeदेश-विदेशDelhi Election 2025 : माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला...वादात सापडल्यावर काय म्हणाले...

Delhi Election 2025 : माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला…वादात सापडल्यावर काय म्हणाले चव्हाण

Subscribe

कॉंग्रेसने येथे चांगले काम केले आहे. त्यामुळे कॉंग्रेससाठी सकारात्मक वातावरण आहे. आमचाच विजय होणार, याची मला खात्री असल्याचे ते म्हणाले आहेत. असे एक ट्वीट देखील त्यांनी सोशल मीडियावर केले आहे.

मुंबई : निवडणूक आयोगाने दिल्लीतील विधानसभा निवडणुकांची नुकतीच घोषणा केली. त्याची रणधुमाळी आता सुरू होईल, त्यापूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेता पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठे विधान केले आहे. यावरून कॉंग्रेसमध्येच अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. (prithviraj chavan on aap win in delhi congress party has gained tremendous)

दिल्लीतील निवडणूक जर इंडि आघाडीने एकत्रितरित्या लढली असती तर त्यांचा विजय होणे निश्चित होते. मात्र, आता सगळेच पक्ष मैदानात उतरले आहेत. कॉंग्रेसने येथे चांगले काम केले आहे. त्यामुळे कॉंग्रेससाठी सकारात्मक वातावरण आहे. आमचाच विजय होणार, याची मला खात्री असल्याचे ते म्हणाले आहेत. असे एक ट्वीट देखील त्यांनी सोशल मीडियावर केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी या माध्यमातून आपल्या विधानामुळे झालेला गोंधळ सावरण्याचा प्रयत्न केला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दिल्लीची निवडणूक ही खूप महत्त्वाची निवडणूक आहे. येथे पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल जिंकून येण्याची शक्यता आहे, असे मला वाटते. कॉंग्रेसही ही निवडणूक लढवते आहे. मात्र, कॉंग्रेस आणि आपने एकत्रितरित्या ही निवडणूक लढवली असती, तर चांगले झाले असते. यामुळे निर्णयही वेगळा लागला असता, असे मला वाटते, असेही ते म्हणाले. दिल्लीत सध्या काय सुरू आहे, हे इथे बसून सांगणे, हे थोडे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Delhi Election 2025 : पृथ्वीराज चव्हाणांच्या भविष्यवाणीवर कॉंग्रेस भडकली; संदीप दीक्षित म्हणाले…

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हे विधान अशावेळी आले आहे, जेव्हा दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकीकडे सत्ताधारी आप दररोज जनतेसाठी काही न काही योजना जाहीर करते आहे, तर दुसरीकडे दिल्ली कॉंग्रेस आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर सातत्याने टीका करते आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. संदीप दीक्षित आपल्या विजयाचा दावा करत आहेत. तर भाजपाने माजी खासदार प्रवेश वर्मा यांना येथून मैदानात उतरवले आहे.

दिल्लीतील ही निवडणूक कॉंग्रेस कोणत्याही आघाडीशिवाय लढते आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी अत्यंत खराब होती. आणि यावेळी देखील त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. त्यातच आपला सपा आणि तृणमूल कॉंग्रेसचे समर्थन मिळाल्याने या अडचणीत भर पडली आहे.

हेही वाचा – Congress Vs AAP : दिल्लीकरांना याचेच आश्चर्य वाटत असावे, ठाकरे गटाने का म्हटले असे?