घरCORONA UPDATEप्रवाशांकडून खासगी टुरिस्ट ऑपरेटर्स जादा भाडे आकारतात

प्रवाशांकडून खासगी टुरिस्ट ऑपरेटर्स जादा भाडे आकारतात

Subscribe

केंद्र सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागरिक येत आहे. या नागरिकांसाठी गेल्या काही दिवसांपासून जीव्हीके प्रशासनाने काही खासगी टुरिस्ट ऑपरेटर्सला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. तर फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर्स यांच्या वाहनांना विमानतळ प्रवेशबंदी केली आहे. तसेच जीव्हीके प्रशासनाने या खासगी ऑपरेटर्सकडून भाडेपोटी मोठी रक्कम घेतली जात असल्याने त्याचा भरपाई नागरिकांकडून केली जात असल्याचा आरोप फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर्सने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत मिशन सुरू केले आहे. त्यानुसार देशातील प्रमुख ९ विमानतळांवर परदेशातून भारतीय नागरिक दाखल होऊ लागले आहेत. यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही समावेश आहे. येणाऱ्या प्रवाशांना विमानतळापासून ते त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी आरटीओने फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर्स (फोटो) यांना दिली होती. गेल्या अडीच महिन्यापासून फेडरेशनद्वारे राज्य शासनाच्या नियमांनुसार माफक दरात प्रवाशांना सेवा पुरवली आहे. तसेच प्रवाशांना आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत एकाच वाहनातून विविध जिल्ह्यातील नागरिकांनाही समान भाडे आकारणी करून त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले. यामध्ये एसी बसेसचाही समावेश होता. फेडरेशनने सुमारे २ हजार वाहनचालकांना या आपत्कालीन परिस्थितीतही रोजगार उपलब्ध करून दिला. मात्र गेल्या काही दिवसांपासून जीव्हीके प्रशासनाने यात जाणीवपूर्वक हस्तक्षेप करत काही खासगी टुरिस्ट ऑपरेटर्सना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली असून फेडरेशनच्या वाहनांना विमानतळ प्रवेशबंदी केली आहे. या खासगी ऑपरेटर्सद्वारे आधीच्या तुलनेत प्रवाशांकडून जास्त भाडे आकारले जात आहे. प्रवासी वाहतुकीत हस्तक्षेप करणारे जीव्हीके प्रशासन गेली अडीच महिने झोपले होते का?, असा सवाल फेडरेशनचे सेक्रेटरी मलिक पटेल यांनी उपस्थित केला आहे. तसेच परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रवाशांकडून जादा भाडे वसूल करणाऱ्या जीव्हीके प्रशासनावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. याबाबत जीव्हीके प्रशासनाने खासगी टुरिस्ट ऑपरेटर्सचा कोणताही मुद्दा नसल्याचे सांगत चालकांचे देखील स्क्रिनिंग होत असल्याचे स्पष्टीकरण दिले.

- Advertisement -

हेही वाचा –

नियमित रेल्वे प्रवासी वाहतूक १२ ऑगस्टपर्यंत रद्द

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -