घरमुंबईबारावीच्या हॉलतिकीटामध्ये सावळागोंधळ

बारावीच्या हॉलतिकीटामध्ये सावळागोंधळ

Subscribe

बारावीची परीक्षा तोंडावर आली असताना प्रवेशपत्रामध्ये (हॉल तिकीट) मोठ्या प्रमाणात चुकांचा सावळागोंधळ होत असल्याचे समोर आले आहे. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत असताना हा गोंधळ निर्माण झाल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथम ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकीट देण्यात आले. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत असताना हॉलतिकीटावर मोठ्या प्रमाणात चुका आढळून येत आहेत. हॉलतिकीटांवर विद्यार्थ्याचे नाव, विषय, परीक्षा माध्यम याविषयी असंख्य चुका आहेत. काही कॉलेजमधून विद्यार्थ्यांकडून चुका दुरुस्ती करण्यासाठी 50 ते 200 शुल्क आकारण्यात येत आहे. चुका सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून कॉलेजमध्ये खेटे मारावे लागत आहेत. त्यामुळे त्यांचा बराचसा वेळ वाया जात आहे.

- Advertisement -

काही विद्यार्थ्यांच्या नावात चूका असून परीक्षेचे माध्यम, विषयातही चुका झाल्या आहेत. काही विद्यार्थ्यांची सही आणि फोटोही हॉलतिकीटावर नीट दिसत नाही.अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. विद्यार्थी भारतीच्या कार्याध्यक्षा साक्षी भोईर, जितेश पाटील, सलोनी तोडकर, मंजिरी धुरी यांनी यासंदर्भात मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडे तक्रार केली आहे. तसेच लवकरात लवकर विद्यार्थ्यांचा हॉलतिकीटचा प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थी भारती तीव्र आंदोलन करेल असा इशारा राज्यध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिला.

सर्व कॉलेजेसना लेखी आदेश दिले आहेत. चुका दुरूस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊ नये, असे सर्व कॉलेजेसना कळविले आहे. पैसे घेताना आढळल्यास कारवाई करणार.– शरद खंडागळे, सचिव, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -