घरमुंबईरेल्वे प्रवाशांना सतावतेय व्हेरिकोज व्हेन्सची समस्या

रेल्वे प्रवाशांना सतावतेय व्हेरिकोज व्हेन्सची समस्या

Subscribe

पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने अनेक बदल केले असले तरी गर्दीच्या वेळी प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. याच कारणाने अनेकांना व्हेरिकोज व्हेन्स सारख्या आजारांना सामोर जावे लागत आहे.

पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने अनेक बदल केले असले तरी गर्दीच्या वेळी प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. शिवाय, प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रवासामध्ये त्यांना सलग २ ते ४ तास उभे राहावे लागते याच कारणाने अनेकांना व्हेरिकोज व्हेन्स सारख्या आजारांना सामोर जावे लागत असल्याचे निरीक्षण बोरिवलीतील अपेक्स हॉस्पिटल समूहाने नोंदवले आहे.

याविषयी अपेक्स हॉस्पिटल समूहाचे वॅस्क्युलर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. मौनील अजय भूता यांनी सांगितलं की, ” प्रवासात सलग तीन ते चार तास उभं राहणं असो किंवा कामाची गरज म्हणून ८ ते १० तास उभे राहिल्यामुळे व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वाढतो. गेल्या सहा महिन्यात आम्ही उपचार केलेल्या एकूण दीडशे रुग्णांपैकी तीस ते चाळीस रुग्ण हे रोजचा रेल्वे प्रवास करत असून दोन वर्षांपासून त्यांना व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास सुरु झाला होता.

- Advertisement -

काय आहे व्हेरिकोज व्हेन्स ?

व्हेरिकोज म्हणजे विस्तारलेल्या, गुंतलेल्या किंवा गाठाळलेल्या आणि व्हेन्स म्हणजे हृदयाकडे अशुद्ध रक्‍त वाहून नेणाऱ्या शिरा. या शिरांचे जाळे संपूर्ण शरीरभर पसरलेले असले तरी त्या विस्तारणे, गाठाळणे हे सहसा पायांच्या शिरांच्या बाबतीत घडते आणि यालाच व्हेरिकोज व्हेन्सअसे म्हणतात. या आजारामध्ये पायावरच्या शिरा अर्निबंधपणे मोठ्या होतात. अशुद्ध रक्त हृदयाकडे नेणाऱ्या झडपांमधल्या बिघाडामुळे किंवा पोटरीच्या स्नायूंच्या अकार्यक्षमतेमुळे ही समस्या उद्भवते. हे रक्त शिरेमध्ये साचते. त्यामुळे पायाला सूज येते, ठणका बसतो, रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने घोटय़ाजवळ सूज येते. त्यावर योग्य वेळी उपचार करण्यात आले नाही तर रुग्णाला चालणेही त्रासदायक होते. पाय दुखतात म्हणून मी औषध घेतो असे सांगणाऱ्या रुग्णांना पहिली तीन ते चार वर्षे व्हेरीकोज व्हेन्स हा आजार झाला आहे हेच कळत नाही.

डेस्क जॉब (बँकेमध्ये) असणार्‍यांना हा त्रास अधिक जाणवतो. सलग ४ ते ५ तास बसून राहिल्याने लठ्ठपणा वाढण्यासोबतच व्हेरिकोज व्हेन्सचा त्रासही वाढतो. जास्त वेळ उभे राहण्याचे काम असलेला वर्ग म्हणजेच ट्रॅफीक पोलीस, सुरक्षा रक्षक, शिक्षक, फेरीवाले तसेच रोजगारावर काम करणारे हमाल अशा लोकांमध्ये वयाच्या चाळीशीमध्येच व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सुरु होतो.

- Advertisement -

लठ्ठपणा तसेच प्रेग्नेंसीच्या काळात होणारे हार्मोन्समध्ये होणारे बदल, बर्थ कंट्रोल गोळ्यांचे अतिसेवन , टाइट अंडरगारमेंट्सच्या सतत वापरांमुळे हा आजार होतो. हा आजार अनुवांशिक सुद्धा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये जवळपास २० टक्के महिला आणि १० टक्के पुरुषांना वयाच्या पन्नाशीमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असल्याचं निदर्शनास आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -