घरमुंबईआता घरबसल्या करा घर-जागा नावावर

आता घरबसल्या करा घर-जागा नावावर

Subscribe

मुंबई महापालिकेच्या मालकीच्या अनेक इमारती आणि भूखंडासह अनेक मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या या भाडेकरूंना भाडेतत्व हक्काचे हस्तांतरण करण्यासाठी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. यासाठी वेळ आणि पैसा अधिक खर्ची होतो. या सर्व बाबींचा विचार करता महापालिकेने ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली असून आता घरबसल्या भाडेतत्व हक्काच्या हस्तांतारणाची प्रक्रिया पार पाडता येणार आहे.

‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत महापालिकेच्या विविध खात्यांशी संबंधित कार्यवाहींची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत इमारत बांधकाम परवानग्या, आरोग्य परवाने, जन्म-विवाह-मृत्यु दाखले, अग्निसुरक्षा विषयक परवानग्या, पाळीव श्वान परवाना,कारखाना परवाना, जाहिरात विषयक अनुज्ञापने, उत्सव मंडप परवानग्या यासारख्या विविध बाबींशी संबंधित कार्यवाही ऑनलाईन करण्यात आली आहे. याच श्रृंखले अंतर्गत आता महापालिकेच्या भाडे तत्वावरील इमारतींमधील भाडेतत्व हक्क हस्तांतरणाची प्रक्रिया देखील ऑनलाईन करण्यात आली असून ती १ जानेवारी २०१९ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या मालमत्ता खात्याच्या ताब्यातील ३ हजार ५०५ भाडेतत्वावरील इमारती (टेनन्सी बिल्डींग) आहेत. त्यातील सुमारे ४६ हजार ५६३ भाडेकरु आहेत. या भाडेकरुंच्या भाडेतत्व हक्कांचे हस्तांतरण करण्याची कार्यवाही ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत कागद – फाईल पद्धतीने या टेबलावरुन त्या टेबलावरील भ्रमंतीसह होत होती. त्यामुुळे या प्रक्रियेला होोनारा विलंब लक्षात घेता, १ जानेवारी २०१९ पासून ‘ईज ऑफ डुइंग बिझनेझ’ अंतर्गत भाडेतत्वावरील मालमत्तांच्या हस्तांतरणाची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील काही अटींसापेक्ष याबाबतची कार्यवाही ३३ दिवसात पूर्ण करणे महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या मालमत्ता खात्याच्या अखत्यारितील इमारतींमधील या घरांच्या भाडेतत्वांचे हस्तांतरण हे घरबसल्या करणे शक्य होईल, असा विश्वास पालिकेच्या मालमत्ता खात्याचे सहाय्यक आयुक्त पराग मसुरकर यांनी व्यक्त केला आहे.

कुठे आणि कशाप्रकारे करावा अर्ज

मुंबई महापालिकेच्या www.mcgm.gov.in किंवा https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर’ऑनलाईन सेवा’ या टॅबवर ‘माऊस पॉइंटर’ (Arrow) नेल्यानंतर ऑनलाईन प्रक्रियांची सूची दिसते. या सूचीमध्ये सगळ्यात शेवटी ‘Estate Department’ हा पर्याय दिसतो. यावर ‘पॉइंटर’ नेल्यावर ‘Apply Online for Building Tenancy Transfer’ आणि ‘Check Application Status’ हे दोन पर्याय दिसतात. यापैकी ‘Apply Online for Building Tenancy Transfer’ या पर्यायावर ‘माऊस क्लिक’ केल्यास’ऑनलाईन’ अर्जाचे पान उघडते. केवळ एक पानाच्या या सहज सुलभ अर्जासोबत ‘प्रतिज्ञापत्र’ (Affidavit) व क्षतिपूर्ती बंधपत्र (Indemnity Bond), मूळ भाडेकरुचे ना हरकतपत्र, वारसदारांचे ना हरकत पत्र, शपथपत्र (Undertaking) इत्यादींच्या ‘स्कॅन कॉपी’ प्रकरणपरत्वे जोडणे आवश्यक आहे.

- Advertisement -

३३ दिवसात होणार कार्यवाही

वरीलनुसार ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी महापालिकेच्या प्रशासकीय विभागांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. पडताळणी दरम्यान कायदेशीर बाबींची तपासणी आणि पूर्तता झाल्यानंतर संबंधित अर्जदारास करारनामा करण्यासाठी आणि आवश्यक ते शुल्क भरण्याकरिता महापालिकेच्या विभाग कार्यालयात निर्धारित दिनांकास बोलविले असल्याची माहिती ‘ई-मेल’ व’एसएमएस’ द्वारे कळविली जाईल. त्यानुसार हस्तांतरण शुल्क भरणा केल्यानंतर निर्धारित दिनांकास महापालिका व संबंधित अर्जदार यांच्यामध्ये करारनामा केला जाईल. पालिकेच्या भाडेतत्वावरील मालमत्तांच्या हस्तांतरणाचा यथोचित अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाल्यापासून संबंधित कार्यवाही ही ३३ दिवसांमध्ये करणे महापालिकेच्या कर्मचा-यांना आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -