घरमुंबईमुंबईतील स्थानकांच्या 'मेकओव्हर'साठी ९४७ कोटी!

मुंबईतील स्थानकांच्या ‘मेकओव्हर’साठी ९४७ कोटी!

Subscribe

उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील लोकल ट्रेन्सची सततची ये-जा, प्रवाशांची अखंड वाहती गर्दी, त्यात भर म्हणून विक्रेते व स्टॉलधारकांची लुडबूड या गोष्टी मुंबईकरांना नवीन नाहीत आणि त्यातही रेल्वे स्थानकांवरील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे त्यांची नेहमीच तारांबळ उडत असते. मात्र आता लवकरच ही परस्थिती बदलणार असल्याचे चित्र दिसते आहे.

शहरातील रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यासाठी तब्बल ९४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या (एमयूटीपी) आराखडा ३ मध्ये ही विशेष तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मुंबई शहर रेल्वे वाहतूक प्रकल्पांसाठी तब्बल ५५ हजार कोटी रपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या एकूण रकमेतील ९४७ कोटी रुपये केवळ रेल्वे स्थानकांच्या मेकओव्हरसाठी वापरण्यात येणार आहेत.

- Advertisement -

रेल्वे स्थानकांच्या कायापालट प्रक्रियेमध्ये- पादचारी पूलांची दुरुस्ती तसंच नव्या पूलांची भर, रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता, प्लॅटफॉर्मची रुंदी वाढ, स्थानकांवर वायफायची सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, लिफ्ट, सरकते जिने आदी गोष्टींचा समावेश आहे. रेल्वे प्रवासी स्थानकांवर असताना त्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यावर आराखड्यामध्ये भर देण्यात आला आहे.

याशिवाय पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिनही मुख्य रेल्वे मार्गांच्या विस्तारीकरणासाठी तसंच विकासाठी विविध प्रस्तावांचा एमयूटीपी-3 आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पनवेल-विरारला जोडणारा नवा मार्ग, बोरिवलीपर्यंत हार्बर लाईनचा विस्तार, बोरिवली ते विरार दरम्यान अतिरिक्त पाचव्या व सहाव्या लाईनचा समावेश, तसंच कल्याण ते आसनगाव दरमयान चौथ्या लाईनचा व कल्याण ते बदलापूर दरम्यान अतिरिक्त तिसऱ्या व चौथ्या लाईनचा समावेश आदी गोष्टींची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -