Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दहावी, बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, 'हे' आहेत बदल

दहावी, बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, ‘हे’ आहेत बदल

Related Story

- Advertisement -

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक अखेर राज्य शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केले. त्यानुसार बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून सुरु होणार असून दहावीची परीक्षा २९ एप्रिलला सुरु होणार आहे. दरम्यान, हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

राज्य शिक्षण मंडळाकडून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दरवर्षी घेण्यात येते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा यंदा उशीराने घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते. त्यानुसार राज्य मंडळाने विद्यार्थ्यांसाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान घेण्यात येणार आहे. तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०१२ पर्यंत घेतली जाणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षांचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी शाळा आणि कॉलेजांना कळविण्यात येणार आहे. बोर्डाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकाबाबत विद्यार्थी पालकांना काही हरकती किंवा सूचना असल्यास २२ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरुपात बोर्डाला कळविण्यात यावे. तसेच बोर्डाने वेबसाईटवर जाहीर केलेल्या वेळापत्रकाशिवाय विद्यार्थी पालकांनी इतर कोणत्याही वेळापत्रकावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -