घरताज्या घडामोडीविविध मागण्यांसाठी अदानी वीज कंपनीतील कामगारांचे निषेध आंदोलन

विविध मागण्यांसाठी अदानी वीज कंपनीतील कामगारांचे निषेध आंदोलन

Subscribe

मुंबई उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या अदानी वीज कंपनीमधील मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनच्या कामगारांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याच्या निषेधार्थ १३ जानेवारी रोजी काळ्या फिती लावून आंदोलन पुकारले आहे.

मुंबई : मुंबई उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या अदानी वीज कंपनीमधील मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनच्या कामगारांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याच्या निषेधार्थ १३ जानेवारी रोजी काळ्या फिती लावून आंदोलन पुकारले आहे. यासंदर्भातील माहिती मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिली. (Protest movement of Adani Power Company workers for various demands)

उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या रिलायन्स एनर्जी कंपनीकडून अदानी वीज कंपनीने २९ ऑगस्ट २०१८ रोजी ताबा मिळवला. मात्र, ताबा मिळवितांना अदानी व्यवस्थापनाने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे मुंबई उपनगर वीज कंपनीमधील स्थायी, कंत्राटी कामगार व अधिकारी यांना कराराअन्वये मिळत असलेल्या सेवाशर्ती देण्यास अदानी व्यवस्थापन कायदेशीर बांधील असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्याची पूर्तता केलेली नाही. तसेच, अदानी व्यवस्थापनाने मुंबई उपनगर वीज कंपनीचा ताबा मिळविल्यापासून १९ सप्टेंबर २०१६ रोजीच्या स्थायी व कंत्राटी कामगारांना कराराप्रमाणे मिळणाऱ्या सोयी-सवलती अद्याप दिल्या नाहीत, अशी तक्रार कामगार नेते विठ्ठल गायकवाड यांनी केली आहे.

- Advertisement -

कामगारांच्या मागण्या सोडविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सदस्य असलेले स्थायी व कंत्राटी कामगार १३ जानेवारी रोजी ‘काळ्या फिती’ लावून काम करून अदाणी व्यवस्थापनाचा निषेध नोंदवणार आहेत, अशी माहिती युनियनचे सरचिटणीस व कामगार नेते विठ्ठलराव गायकवाड यांनी दिली आहे.

कामगारांच्या मागण्या काय?

- Advertisement -
  • मुंबईच्या उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनी व्यवस्थापनाने कंत्राटी कामगारांना भविष्य निर्वाह निधी भरणा केलेली पावती सन २०१० पासून देण्याची व्यवस्था करावी.
  • कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्त पावलेल्या कामगारांच्या वारसांना ५० लाख रुपयाची आर्थिक मदत व वारसांना कंपनीच्या सेवे मध्ये सामावून घेण्यात यावे.
  • कोरोना महामारीमध्ये जीव धोक्यात घालून अखंड सेवा देणाऱ्या कामगारांना ‘बेस्ट’ उपक्रमाच्या कामगारांप्रमाणे प्रत्येक कामाच्या दिवसासाठी ३०० रुपये दराने कोरोना भत्ता देण्यात यावा.
  • कामावर हजर राहताना व कामावरून घरी जाताना फेस पंचींग करण्याची अनिष्ठ पध्दती रद्द करावी.
  • १९ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या करारा अन्वये कंत्राटी कामगारांना व कामगारांच्या मुलाना टप्याटप्प्याने कायम पदावर भरती करण्याची योजना अमलात आणावी.

हेही वाचा – दिलासादायक! किरकोळ महागाईचा दर वर्षभरात निचांकीवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -