घरCORONA UPDATEकोरोनाबाधितांसाठी प्रत्येक विभागांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करा; भाजप नगरसेवकाची मागणी

कोरोनाबाधितांसाठी प्रत्येक विभागांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करा; भाजप नगरसेवकाची मागणी

Subscribe

बाधित रुग्णाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यास नेण्यासाठी रुग्णवाहिका आणि सुरक्षा पोशाख अर्थात पीपीई परिधान केलेले प्रशिक्षित कामगार मिळत नसल्याने अनेक मोठी गैरसोय होते.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असून अनेक रुग्णांचा बऱ्याच वेळा घरी मृत्यू होता. परंतु त्यांच्या मृतदेहाला रुग्णवाहिकांचे तसेच नातेवाईकही हात लावायला तयार नसतात. त्यामुळे अशा बाधित रुग्णाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यास नेण्यासाठी रुग्णवाहिका आणि सुरक्षा पोशाख अर्थात पीपीई परिधान केलेले प्रशिक्षित कामगार मिळत नसल्याने अनेक मोठी गैरसोय होते. आणि यासाठी अनेक तास वाया जाता. त्यामुळे प्रत्येक विभागात कोरोनाबाधित रुग्णांचा मृतदेह नेण्यासाठी पीपीई किटधारी कामगारांसह रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकाने केली आहे.

भाजपचे मुलुंड येथील नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. ज्यामध्ये त्यांनी महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांसाठी दोन कामगारांसह रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी. ज्याद्वारे विभागातील कुणा करोनाबाधित रुग्णांचा घरीच मृत्यू झाल्यास त्यांचे शवही याच रुग्णवाहिकेतून नेता येवू शकते. शिवाय प्रसंगी विभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यासह हाय रिस्कमधील व्यक्तींना क्वारंटाईनमध्ये पाठवण्यासाठी याचा वापर करता येईल. त्यामुळे महापालिकेच्यावतीने २४ विभागांसाठी कोरोनासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा विचार व्हावा, असे म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबईत सध्या कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अधिक प्रमाणात वाढून बाधित रुग्ण आणि त्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात एखादा कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास मृतदेह योग्यप्रकारे प्लास्टिकमध्ये गुंडाळून दोन सुरक्षा पोशाख अर्थात पीपीई परिधान केलेल्या दोन कामगारांसह रुग्णवाहिकांमधून अंतिम कार्यासाठी पाठवले जातो. परंतु एखाद्याचा मृत्यू घरीच झाल्यास त्यांच्या मृतदेहाला सुरक्षेच्या कारणास्तव कोणीही हात लावण्यास तयार नसतो. पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या व्यक्तींसह रक्तांच्या नात्यांची माणसेही हात लावायला तयार नसतात. अशा वेळी विभागाच्या सहायक आयुक्तांना तसेच स्थानिक नगरसेवकांना शोध घेवून रुग्णवाहिका व पीपीई धारक कामगारांची व्यवस्था करावी लागते.  यासाठी अनेकदा ८ ते १२ तासांचा कालावधी लागतो,असे गंगाधरे यांनी म्हटले आहे.

पाच दिवसांपूर्वी दादरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकांचा मृतदेह १२ तास खाटेवर पडून होता. रुग्णवाहिका आली तरी त्यातील कामगारांनी मृतदेहाला हात लावण्यास नकार दिला होता. त्यातच त्यांच्या दोन्ही मुलांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, त्यांना मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवण्याची महापालिकेने केली होती. परंतु त्यांनीही न ठेवल्याने तब्बल बारा तासांनी पीपीई किट देवून दोन कामगार तयार करून त्या रुग्णवाहिकेतून अंतिम संस्कारासाठी पाठवण्यात आले होते. तर भांडुपमध्येही अशाचप्रकारे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शवाला हात लावण्यास कुणी तयार होत नव्हते. अखेर समजूत काढून मग तो मृतदेह काही तासांच्या नाट्यानंतर रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आला. त्यामुळे ही पार्श्वभूमी पाहता व पुढील धोका लक्षात घेता प्रत्येक विभागांमध्ये पीपीई किटधारी प्रशिक्षित कामगारांसह सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यास विभागातील जनतेला मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -