घरमुंबईआरोग्य अहवालावर बोगस डॉक्टरची सही; गुन्हा दाखल

आरोग्य अहवालावर बोगस डॉक्टरची सही; गुन्हा दाखल

Subscribe

सिध्दकला काॅम्प्युटराईज्ड पॅथाॅलाॅजी लॅबमधून वितरीत करण्यात येणाऱ्या रूग्णाच्या आरोग्य अहवालांवर राजेंद्र निकम (एमडी. पॅथ) अशी सही आढळून येत होती. पण, या डाॅक्टरचे नाव महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी न झाल्याचे पोलिसांना तपासाअंती समजून आले.

पॅथाॅलाॅजी लॅबमधून आरोग्य अहवालांवर खोट्या सह्या करणाऱ्यांविरोधात राज्य असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथाॅलाॅजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलोजिस्ट संघटनेकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण, यावर सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता संघटना करत आहे. असाच एक प्रकार पनवेलमध्ये घडला आहे. सिध्दकला काॅम्प्युटराईज्ड पॅथाॅलाॅजी लॅबमधून वितरीत करण्यात येणाऱ्या रूग्णाच्या आरोग्य अहवालांवर राजेंद्र निकम (एमडी. पॅथ) अशी सही आढळून येत होती. पण, या डाॅक्टरचे नाव महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी न झाल्याचे पोलिसांना तपासाअंती समजून आले.

काय आहे नेमकं प्रकरण?

एमडी. पॅथ. डिग्री लावून राजेंद्र निकम या नावाची सही रूग्णांच्या आरोग्य अहवालावर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली. पण, पोलिसांना डाॅ. निकम नाव असलेली कोणतीही व्यक्ती एमडी. पॅथ ही शैक्षणिक अर्हता प्राप्त करून नोंदणी कृत वैद्यकीय व्यावसायिक आढळून आली नाही. त्यामुळे नोंदणी कृत वैद्यकीय व्यावसायिक नसताना पॅथाॅलाॅजी व्यवसाय करून रूग्ण अहवालावर स्वाक्षरी करणे, हा महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक कायद्यानुसार १९६१ चा कलम ३३ प्रमाणे अवैध वैद्यकीय व्यवसाय ठरतो. अशा प्रकारे अवैधरित्या व्यवसाय करणं रूग्णांची आर्थिक फसवणूकही होते. या प्रकरणाची वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश मोरे, पो. उपनिरीक्षक वैभवकुमार रोंगे यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे चौकशी केल्यानंतर ही व्यक्ती परिषदेकडे नोंदणीकृत नसल्याचे निदर्शनास आले. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय कायदा १९६१ (३३)(२) तसेच ४२० आणि इतर उचित कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पॅथाॅलाॅजी संघटनेकडून होत आहे.

नोंदणीकृत पॅथाॅलाॅजीस्ट आणि रूग्णांना बोगस लॅबच्या ताब्यात देवून होणाऱ्या गैरप्रकारांना समर्थन देणारे वैद्यकीय व्यावसायिक तसेच या सर्व प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणारे सरकार या सर्वांनी विचार करण्याची वेळ आली आहे.
– डाॅ. प्रसाद कुलकर्णी, सदस्य, राज्य असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथाॅलाॅजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलोजिस्ट संघटना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -