घरमुंबईजनसंपर्क अधिकाऱ्याचा पुनर्जन्म!

जनसंपर्क अधिकाऱ्याचा पुनर्जन्म!

Subscribe

जन्म रहस्य गुपित रहावे म्हणून भदाणे यांनी प्राचार्या आर.के तलरेजा यांना पत्र देऊन, माझी वैयक्तीक माहिती प्रवेश, जन्म दाखला इतर कोणासही देऊ नये आणि दिल्यास माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला आपण जबाबदार राहाल, अशा आशयाचे पत्र दिले होते.

उल्हासनगर महापालिकेचे वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांचा दोन वेळेस जन्म झाल्याची नोंद उघडकीस आली आहे. पहिल्या जन्माची नोंद प्रा.म.विद्या मंदिर, पळासखेडीस, ता.पाचोळा शाळेतील असून दिनांक २३ जून १९८३ रजि.६४२ बुक नं.३ या नुसार युवराज भदाणे प्रथम १ जून १९७० रोजी जन्मले तर दुसरी नोंद आर.के.तलरेजा विद्यालयाच्या लिव्हिंग सर्टिफिकेटनुसार त्यांचा जन्म त्यानंतर बरोबर दोन वर्षांनी १जून १९७२ रोजी झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे भदाणे यांचा जन्माचा बनाव समोर आला आहे. हे जन्म रहस्य गुपित रहावे म्हणून भदाणे यांनी प्राचार्या आर.के तलरेजा यांना पत्र देऊन, माझी वैयक्तीक माहिती प्रवेश, जन्म दाखला इतर कोणासही देऊ नये आणि दिल्यास माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला आपण जबाबदार राहाल, अशा आशयाचे पत्र ३ एप्रिल २०१७ रोजीच दिले होते. उल्हासनगर मनपाचे संपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या धनसंपत्तीची माहिती माजी नगरसेवक, विरोधी पक्ष नेते दिलिप मालवणकर यांनी समोर आणली असून त्यांनी भदाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याने केले होते उपोषण

उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्याकडील अतिरिक्त पदभार आयुक्त गणेश पाटील यांनी काढून घेतल्यानंतर भदाणे रजेवर गेले. मात्र त्यांनी आपल्या कार्यालयाची चावी सोबत नेली. बर्‍याच खलबतीनंतर त्यांचे ऑफीस खुद्द आयुक्तांनी उघडले. त्यात कोरे चेक, विविध विभागांच्या ३५० फाईली ,शासकीय उपायुक्त पदाचे राज्य शासनाचे ओळख पत्र, आदी वस्तू सापडल्या. त्या नंतर भदाणे यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली, मात्र आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने आपण उपोषण केल्याचे मालवणकर यांनी सांगितले.

- Advertisement -
yuvraj bhadane
युवराज भदाणे, जनसंपर्क अधिकारी, उल्हासनगर महापालिका

मी रितसर रजा घेऊन कुटुंबासह बाहेर गेलो होतो. त्यामुळे माझ्या कार्यालयाची चावी अनवधानाने माझ्याकडे राहिली. माझ्याकडे अनेक विभागांचे अतिरिक्त चार्ज होते. त्या संबंधित फाईल्स माझ्या कार्यालयातून मिळाल्या आहेत. माझ्या कडे मालमत्ता विभागाचा देखिल चार्ज होता. ज्या मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरला नव्हता. त्याच्यांकडून मी अगाऊ रक्कमेचे चेक घेतले होते. कर भरल्यानंतर ते त्यांचे चेक परत घेऊन गेले नाहीत. ते चेक मिळाले आहेत. माझ्या कार्यपध्दती मुळे अनेक राजकीय नेते. समाजसेवक पत्रकार दुखावले असतील त्यांनी कटकारस्थान करुन मला पालिका प्रशासनातून निलंबित करण्याचा डाव आखला आहे. मात्र मी निर्दोष असून माझा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे.
– युवराज भदाणे, जनसंपर्क अधिकारी, उल्हासनगर महापालिका

युवराज भदाणे यांच्या प्रकरणाविषयी माहिती घेतली जात आहे. तसेच चौकशी सुरू आहे. त्याबाबत आताच काही सांगता येणार नाही.
– गणेश पाटील, उल्हासनगर, महापालिका आयुक्त

- Advertisement -

दत्ता खरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -