घरताज्या घडामोडी'अमेरिकन पिटबुल' कुत्र्याचे कान कापून विक्रीचा मुंबईतील प्रकार, कारण आले समोर

‘अमेरिकन पिटबुल’ कुत्र्याचे कान कापून विक्रीचा मुंबईतील प्रकार, कारण आले समोर

Subscribe

सर्वात अधिक मागणी असणाऱ्या अमेरिकन पिटबुल जातीचे श्वानांचे कान कापून त्यांची विक्री केली जात आहे. चेंबूर पोलिसांनी पुण्याहून मुंबईत आणण्यात आलेल्या कान कापलेले ७१ दिवसांचे अमेरिकन पिटबुल ताब्यात घेऊन त्याची रवानगी परळच्या बैल घोडा रुग्णालय येथे करण्यात आली आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो गुन्हा पुढील तपासासाठी पुण्यातील मुंढवा पोलिसांकडे वर्ग केला आहे. 

 

- Advertisement -

पुण्याहून मुंबईच्या दिशेने एका अर्टिगा कारमधून अमेरिकन पिटबुल श्वानाचे पिल्लू आणले आत असून त्याचे कान कापण्यात आलेले आहेत अशी माहिती प्राणी मित्र आनंद मोहिते यांनी चेंबूर पोलिसांना दिली होती. चेंबूर पोलीसानी रविवारी रात्री सायन ट्रॉमबे रोडवरील डायमंड गार्डन येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या अर्टिगा कार थांबऊन त्यातील अमेरिकन पिटबुल या ७१ दिवसाच्या श्वान ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्या श्वानाचे दोन्ही कान विशिष्ट प्रकारे कापण्यात आले होते. 

 

- Advertisement -

हे अमेरिकन पिटबुल श्वान पुण्यातील मुंढवा येथे राहणारे अखिलेश विशाल जाधव यांनी दादर येथे राहणारे धनंजय गायकवाड यांना देण्यासाठी दिले असल्याचे अर्टिगा कार चालकाने पोलीसाना माहिती दिली, तसेच या श्वानाचे कान अखिलेश जाधव यांनी एका विशिष्ट प्रकारे कापले होते. अधिक हिंस्त्र वाटावे म्हणून अमेरिकन पिटबुल या श्वानाचे कान कापले जात आहे, या श्वानांचे कान लहानपाणीच कापले जातात अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

मात्र या प्रकारे कान कापून प्राण्यांना दुखापत करणे हे कायद्याने गुन्हा आहे. याप्रकरणी प्राणी मित्र आनंद मोहिते यांच्या तक्रारीवरून प्राण्यांना क्ररतेने वागवण्याचा अधिनियम १९६० अन्वये गुन्हा नोंदवन्यात आला असून पुढील तपासासाठी  मुंढवा पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे.  

 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -