घरमुंबईपोलिस यंत्रणेची झोप उडवणार्‍या पुण्यातील व्यवसायिकाला अटक

पोलिस यंत्रणेची झोप उडवणार्‍या पुण्यातील व्यवसायिकाला अटक

Subscribe

खोटी माहिती देऊन मुंबई पोलिसांची दिशाभूल करणे पुण्यातील एका व्यवसायिकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. तीन संशयित दहशतवादी मुंबई, पुणे, नाशिकसह पाच शहरांमध्ये घातपात करण्याच्या तयारीत असल्याची खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेची झोप उडवणार्‍या पुण्यातील व्यवसायिकाला विलेपार्ले पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे आलेल्या नैराश्यांतुन त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

प्रसाद रसाळ (32)असे या व्यवसायीकाचे नाव आहे. पुण्यातील हडपसर येथे राहणारा प्रसाद हा 21 जुलै रोजी पुण्याहून मुंबईला आला, तेथून त्याने थेट मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय येथे जाऊन तेथील तैनात असलेल्या पोलिसाना भेटला. विलेपार्ले पूर्व या ठिकाणी हनुमान रोड बस स्थानक या ठिकाणी तीन संशयित इसम हिंदी मिक्स उर्दू मध्ये एकमेकांशी चर्चा करताना ऐकले की, हे तिघे राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर या शहरांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात दहशतवादी हल्ले करणार आहेत,अशी माहिती त्याने आयुक्तलयातील पोलिसांना दिली. पोलिसानी ताबडतोब वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना कळवून अधिक चौकशीसाठी प्रसाद रसाळ याला विलेपार्ले पोलिसांच्या ताब्यात देऊन सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा दिला.

- Advertisement -

विलेपार्ले पोलिसांनी प्रसादकडे चौकशी करून त्याची उलटतपासणी सुरू केली असता त्याने खोटी माहिती दिली असल्याचे समोर आले, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, प्रसाद हा व्यवसायिक असून त्याला व्यवसायात होणारे नुकसानीतून नैराश्य आले होते, त्यात त्याला टीव्हीवरील हिंदी मालिका सीआयडी, आणि दहशतवादावरील चित्रपट बघण्याची आवड होती, त्यातून त्याला ही कल्पना सुचली आणि त्याने हा बनाव रचल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले.या प्रकरणी विलेपार्ले पोलीसांनी त्याच्याविरुद्ध खोटी अफवा पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -