Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई पुण्यात जंगली रोड परिसरात लागलेल्या आगीत ३० वाहने जळून खाक

पुण्यात जंगली रोड परिसरात लागलेल्या आगीत ३० वाहने जळून खाक

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

Related Story

- Advertisement -

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या गाड्यांना भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या दाखल झाल्या होत्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. पोलिसांनी कारावई करत या गाड्या जप्त केल्या होत्या. आगीत काही गाड्या भस्मसात झाल्या असल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागानं कारवाई करुन तसेच गुन्ह्यात जप्त केलेल्या गाड्या जंगली महाराज रोड परिसरात ठेवल्या होत्या. याच गाड्यांना अचानक आग लागल्याने सुमारे ३० गाड्यांचे आगीमुळे नुकसान झाले आहे. गाड्यांना लागलेल्या भीषण आगीचे लोळ उंचउंच झेपावर होते. स्थानिक नागरिकांनी घटनेची महिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवून कुलिंग ऑपरेशन पुर्ण केले आहे.

जंगली महाराज रोड परिसरात महापालिकेच्या जागेत या गाड्या ठेवल्या होत्या, यामध्ये हजार दुचाकी आणि चारचाकी गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. या वाहनांना अचानक आग लागल्यावर क्षणार्धात वाहनाना भडका उडाला. मोठ्या प्रमाणात गाड्या असल्यामुळे लगेच गाड्यांनी पेट घेतला यामुळे अनेक गाड्या भस्मसात झाल्या आहेत. परंतु ही आग नेमकी कसामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

आग कशी लागली याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. जप्त केलेली वाहने पोलीस जंगली महाराज रोड परिसरात ठेवतात. या ठिकाणाहून वाहन धारक दंड भरुन आपले वाहन पोलीसांच्या ताब्यातून घेऊन जातात. अनेक वाहनधारक वाहन घेण्यास येत नाहीत. त्यामुळे ही वाहने वर्षा नु वर्षे धुळ खात पडून राहतात. अचानक लागलेल्या आगीमुळे वाहने जळल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -