घरमुंबईराजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले; गिरीश बापट यांना विखे पाटलांची श्रद्धांजली

राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले; गिरीश बापट यांना विखे पाटलांची श्रद्धांजली

Subscribe

पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले आहे. आज सकाळी त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचार केले जात असतांना गिरीश बापट यांचे निधन झाले. काही महिन्यांपासून गिरीश बापट यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची तब्येत काही प्रमाणात सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा आज त्यांना प्रकृती खालावली होती त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गिरीश बापट यांच्या निधनानंतर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

भाजपाचे नेते आणि खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले असल्याची भावना यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. विखे पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे विधीमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी बापट साहेब संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. पण राजकारणात फार कटूता येवू न देता संवादामुळे सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.”

- Advertisement -

हे ही वाचा : Police Recruitment : पोलीस भरतीतील धावण्याच्या शर्यतीतही चिटिंग, १६ उमेदवारांविरोधात गुन्हे

- Advertisement -

तसंच महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीष बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता. पुणे आणि गिरीष बापट हे एक अतूट नाते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नूकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी गिरीष बापट यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -