Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अग्निशमन दलातील नवीन कर्मचाऱ्यांसाठी जादा दराने गणवेश खरेदी

अग्निशमन दलातील नवीन कर्मचाऱ्यांसाठी जादा दराने गणवेश खरेदी

मागील खरेदी दरापेक्षा ९५ लाख जास्त खर्चणार

Related Story

- Advertisement -

मुंबई अग्निशमन दलात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या ३४० अग्निशामक कर्मचाऱ्यांसाठी गणवेश व उपकरण संच मागील खरेदी दरापेक्षाही जास्त दराने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून कंत्राटदारास तब्बल ९५ लाख रुपये जादा मोजण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मात्र या गणवेशाचा दर्जा कसा असेल आणि मागील दरापेक्षाही यंदा जास्त दर मोजण्यात येणार असल्याने याबाबत विरोधक व भाजप यांच्याकडून विचारणा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मुंबई अग्निशमन दलात नव्याने ३४० अग्निशामक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नवीन गणवेश देणे आवश्यक आहे. तसेच काही उपकरणेही देण्यात येणार आहेत. यामध्ये, ३४० नग कोट, ट्राऊजर, हुड, ग्लोव्हज, हेल्मेट इत्यादी उपकरणे देण्यात येणार आहेत.
या गणवेश व उपकरणे यांचा पुरवठा करण्यासाठी दोन कंत्राटदारांनी टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मात्र एक कंत्राटदार आवश्यक कागदपत्रे उपलब्ध न केल्याने अपात्र ठरला. तर दुसरा कंत्राटदार मेसर्स श्रीललिता यांना पात्र ठरविण्यात आले. त्यानुसार या कंत्राटदाराला गणवेश व उपकरणे पुरवठा करण्यासाठी २ कोटी ९९ लाख ३० हजार ४७२ रुपये मोजण्यात येणार आहेत.

३४० फायरमन कोट आणि ट्राऊजर प्रति नगासाठी ३३ हजार १५३ रुपये ( मागील दर २६ हजार ५८८ रुपये) याप्रमाणे एकूण १ कोटी १२ लाख ७२ हजार रुपये, तर फायरमन हुड प्रति नगासाठी २ हजार ५२८ रुपये प्रमाणे ( मागील दर १ हजार ९८१ रुपये) एकूण ८ लाख ५९ हजार ६७६ रुपये, फायरमन ग्लोव्हज प्रति नगासाठी ५ हजार ९१० रुपये याप्रमाणे ( मागील दर ५ हजार ५४ रुपये) एकूण २० लाख ९ हजार ५०२ रुपये, तर हेल्मेट प्रति नगासाठी ४३ हजार ५३ रुपये ( मागील दर २३ हजार २५५ रुपये) याप्रमाणे एकूण १ कोटी ४६ लाख ३८ हजार ६० रुपये असे एकूण २ कोटी ८७ लाख ७९ हजार ३०० रुपये अधिक ४% सादीलवार म्हणजे ११ लाख ५१हजार १७२ रुपये असे एकूण २ कोटी ९९ लाख ३० हजार ४७२ रुपये कंत्राटदाराला मोजण्यात येणार आहेत.

मागील खरेदीपेक्षा ९५ लाख जास्त खर्चणार

- Advertisement -

मात्र ३४० नग खरेदीसंदर्भात सध्याचे व मागील दर यांची तुलना केल्यास पालिका संबधित कंत्राटदाराला कोट- ट्राऊजर यांच्या खरेदीपोटी प्रति नगामागे ६ हजार ५६४ रुपयांप्रमाणे २२लाख ३१ हजार ८६८ रुपये जादा, हुडच्या खरेदीपोटी प्रति नगामागे ५४७ रुपये याप्रमाणे एकूण १ लाख ८६ हजार ४१ रुपये जादा, तसेच, ग्लोव्हज खरेदीपोटी प्रति नगामागे ८५५ रुपये याप्रमाणे एकूण २ लाख ९० हजार ८९७ रुपये जादा आणि हेल्मेट खरेदीपोटी प्रति नगामागे १९ हजार ७९७ रुपये याप्रमाणे एकूण ६७ लाख ३१ हजार २११ रुपये असे एकूण खरेदीपोटी तब्बल ९४ लाख ४० हजार १७ रुपये जादा मोजण्यात येणार आहेत


हेही वाचा – ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची पोलीस गृहनिर्माण मंडळात व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

- Advertisement -

 

 

 

- Advertisement -