QR कोडशिवाय सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश नाही; जाणून घ्या किती वाजता मंदिर होणार खुलं आणि बंद?

QR code compulsory for siddhivinayak temple entry
QR कोडशिवाय सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश नाही; जाणून घ्या किती वाजता मंदिर होणार खुलं आणि बंद?

कोरोनाच्या केसेस आता कमी होत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने राज्यातील अनेक निर्बंधात शिथिलता दिली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय महत्त्वाचा निर्णय घेतला. येत्या ७ ऑक्टोबर म्हणजेच घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे भाविकांसाठी उघडली जाणार आहे. कोरोनाचे नियम पाळून भाविकांसाठी मंदिरं खुली केली जाणार आहेत. याच अनुषंगाने सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आंदेश बांदेकर यांची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये आदेश बांदेकर यांनी सिद्धिविनायक मंदिर कधी खुलं होणार, बंद होणार आणि क्यूआर कोडच्या व्यवस्थेबाबत सांगितले आहे.

क्यूआर कोडशिवाय सिद्धिविनायक मंदिरात नो एंट्री

आदेश बांदेकर म्हणाले की, ‘सिद्धिविनायक मंदिरात प्रवेशसाठी क्यूआर कोड बंधनकारक आहे. क्युआर कोड दाखवल्यानंतर शरीराचं तापमान व्यवस्थित असेल आणि मास्क घातला असेल तर एक्सेस बॅरिगेट उघडणार आहे. त्यानंतर तुम्ही मंदिरात येऊ शकता. तिथे स्वतःची चप्पल स्वतः काढून ठेवण्याची व्यवस्था केली गेली आहे. त्याचबरोबर पाय धुवून व्यवस्थिती सॅनिटायईज करून मंदिरात प्रवेश करू शकता. मंदिरात प्रवेशासाठी येत असताना, सर्व प्रकारच्या एसओपीचं पालन करायचं ठरवलं असल्यामुळे कुठल्याही प्रकारची ऑफरिंग घेऊन येता येणार नाही आहे. आपणास नम्र आवाहन आहे, कोणतही वस्तू आणू नये, जेणेकरून आपल्याला अडथळा निर्माण होईल. आपण या मंदिरात आल्यानंतर बाप्पाचं दर्शन घ्या. प्रत्येक भाविकांच्यामध्ये सहा फुटांच अंतर आखून दिलं आहे, त्याठिकाणी जमिनीवर स्टिकर लावण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने प्रत्येकजण पुढे सरकालं आणि लवकरात लवकर दर्शन घेतलं तर प्रत्येकाला व्यवस्थित दर्शन घेता येईल.’

भाविकांना कधी मिळणार दर्शन? 

‘दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे सकाळी सात वाजता दर्शन सुरू होणार आहे. प्रत्येक तासाचे क्यूआर कोड असणार आहेत. त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत बारा ते एक नैवेद्यासाठी मंदिर बंद राहिलं. यावेळेत प्रवेश  घेता येणार नाही. पुन्हा एक वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत या पहिल्या टप्प्यात सर्व भाविकांना ज्यांनी आपलं बुकिंग केलं आहे. त्यांना दर्शन घेता येणार आहे. महत्त्वाची सूचना दर गुरुवारी दुपारी बारा वाजता क्यूआर कोड मंदिर न्यासाकडून आपल्यासाठी उपलब्ध होतील. ६ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी मंदिराकडून क्यूआर कोड देण्यात येणार आहे. ज्यांना ज्यांना आपले अॅप डाउनलोड करून आपली वेळ निश्चित करायची आहे, त्यांना उद्या दिनांक ६ ऑक्टोबरपासून दुपारी बारा वाजता ७ ऑक्टोबरपासूनच्या दर्शनाचे क्यूआर कोड उपलब्ध होतील. त्यानंतर दर गुरुवारी पुढच्या आठवड्याचे क्यूआर कोड देण्यात येतील. यापूर्वी या यंत्रणेतून सर्व भाविकांनी दर्शन घेतलं होत. जर ऑनलाईन मार्फत क्यूआर कोड घेऊन अपॉईंटमेंट घेऊ शकला नाहीत, तर आपल्याला दर्शन घेता येणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ऑफलाईन दर्शनाची व्यवस्था पूर्णतः बंद करण्याचा निर्णय न्यासा व्यवस्थापन समितीने घेतला आहे. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करूनच वेळ आरक्षित करून आपल्याला यायचं आहे,’ असे आदेश बांदेकर म्हणाले.

तसेच त्यांनी पुढे सांगितलं की,’ पहिल्या टप्प्यात प्रतितास २५० भाविकांना दर्शन घेता येणार आहे. आणि मग टप्प्याटप्प्याने कोरोनाचं प्रमाण कमी होत गेलं, त्याप्रमाणे ही संख्या वाढवू शकेल. पण यासाठी सर्व भाविकांचं सहकार्य आवश्यक आहे. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपलं स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.’