घरमुंबईआयआयटी मुंबईनं दिल्लीला टाकलं पिछाडीवर

आयआयटी मुंबईनं दिल्लीला टाकलं पिछाडीवर

Subscribe

बुधवारी जाहीर झालेल्या ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी २०१९ रँकिंग’ या लिस्टमध्ये सर्वोत्कृष्ट १००० मधील भारतीय विद्यापीठांची संख्या २० वरून २४ झाली आहे.
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई देशात अव्वल
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (आयआयटी-बी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी), बेंगळुरू आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (आयआयटी-डी) या सर्वोत्कृष्ट २०० मध्ये आहेत.
क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी २०१९ च्या रँकिंगमध्ये आयआयटी मुंबईने गेल्या वर्षीपेक्षा २०१८ च्या यादी १७ क्रंमाकांनी प्रगती केली आहे. ती या रँकिंगमध्ये १६२ क्रमांकावर आहे. परंतु आयआयटी दिल्ली ही वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये अद्यापही गेल्या वर्षीच्याच म्हणजे १७२व्या क्रमांकावर आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनेही आयआयटी दिल्लीला मागे टाकत १७० वे स्थान गाठले आहे.
रँकिंगची १५ वी आवृत्ती
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटीने जाहीर केलेली रँकिंगची ही १५ वी आवृत्ती आहे. ही जगातील सर्वात जास्त अधिकृत आणि प्रतिष्ठित मानली जाणारी संस्था आहे.
ग्लोबली मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ही गेली ७ वर्ष सातत्याने आपले स्थान पहिल्या क्रंमाकावर टिकवून आहे. क्यूएसच्या या यादीत ८५ देशांमधील जगातील अव्वल १ हजार इन्स्टिट्युट आहेत. भारतातील २४ इन्स्टि्ट्युटपैकी १७ भारतीय इन्स्टि्ट्युट या शैक्षणिक प्रतिष्ठेच्या मानाने आपला दर्जा सुधारत आहेत. तर १३ इन्स्टिट्युट या कर्मचाऱ्यांची गुणवत्ता सुधारत आहेत, असे क्यूएस रिसर्चचे संचालक बेन सॉवर यांनी सांगितले.
उपाययोजना अंमलबजावणीचे यश
ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट (एचआरडी) मंत्रालयाचे उच्च शिक्षण सचिव आर. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, भारतातील उच्च शिक्षण संस्थांची सुधारलेली गुणवत्ता हे भारत सरकारने घेतलेल्या प्रभावी उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे यश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -