घरताज्या घडामोडीCoronaVirus:...म्हणून मुंबईत ५० हजार रुग्णांसाठी क्वारंटाईनची व्यवस्था

CoronaVirus:…म्हणून मुंबईत ५० हजार रुग्णांसाठी क्वारंटाईनची व्यवस्था

Subscribe

प्रत्येक परिमंडळ निहाय क्वारंटाईसाठी महापालिकेची जोरदार तयारी केली आहे.

मुंबई सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. भविष्यातही ही संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेच्यावतीने क्वारंटाईनची अतिरिक्त व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे भविष्यात क्वारंटाईनची क्षमता ५० हजार करण्यात येत आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत मुंबईत ५० हजारपर्यंत रुग्ण संख्या होईल यादृष्टीकोनातून ही व्यवस्था केली जात आहे.

मुंबई महापालिकेने सात परिमंडळांचा आढावा घेऊन त्यामध्ये २८ मेपर्यंत ५० हजार लोकांची क्षमता असलेल्या क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात येत आहे. सध्या सर्व परिमंडळांमध्ये लक्षणे नसलेल्या परंतु पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी १३ ते १४ हजार क्षमतेच्या क्वारंटाईन वापरात आहे. परंतु भविष्यातील गरज लक्षात घेता ही क्षमता आता ५० हजारापर्यंत केली जात आहे. यामध्ये परिमंडळ एक मध्ये  १९०१ तर परिमंडळ दोनमध्ये ७२००, परिमंडळ तीन १५१४, तर परिमंडळ चारमध्ये ५५२ रुग्ण खाटांची क्षमता अतिरिक्त व्यवस्था करूनही कमी आहे. तर परिमडळ पाच, परिमंडळ सहा आणि परिमंडळ सातमध्ये अतिरिक्त बेडची क्षमता आहे. त्यामुळे प्रत्येक परिमंडळांमध्ये अतिरिक्त बेडची संख्या वाढवण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. यासाठी महापालिकेच्या शाळा, खासगी शाळा, जिमखाने, एसआरए इमारत, महाविद्यालय, बॅक्वेट हॉल, हॉटेल, रुग्णालय, हॉल, इमारत आदी वास्तूंमध्ये अतिरिक्त बेडची संख्या वाढवली जात आहे.

- Advertisement -

कोरोनाची महामारी नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना महापालिका आणि सरकारच्यावतीने केल्या जात आहेत. यासाठी खासगी हॉल, शाळा आदी वस्तू रुग्णांसाठी ताब्यात घेण्यात येत आहेत. एवढे करूनही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यामुळे सन्मानीय आमदारांसाठी असलेले आमदार निवास व आमदार हॉस्टेल आता रिकामी असल्यामुळे त्यांचा वापर आता क्वारंटाईन म्हणून करण्यात यावा. सध्या सर्व आमदार आपल्या गावी, जिल्ह्यात असून ते आपल्या मतदार संघात जनतेची सेवा करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे या दोन्ही वास्तू रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी वापरात आणाव्यात,अशी मागणी भाजपचे दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश  शिरवडकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.

परिमंडळ निहाय क्वांरटाईनची क्षमता

परिमंडळ : १

- Advertisement -

एकूण बेडची गरज = १०, २९१

सध्याची बेडची क्षमता : १८०१

अतिरिक्त बेडची संख्या :  ८४९०

कमी असलेले बेड  : १९०१

परिमंडळ : २

एकूण बेडचीगरज = १४७५०

सध्याची बेड क्षमता : ६२०५

अतिरिक्त बेडची संख्या :  ८५४५

कमी असलेले बेड : ७२००

परिमंडळ : ३

एकूण बेडची  गरज = ५७५५

सध्याची बेड क्षमता : ४१९

अतिरिक्त बेडची संख्या :  ५३३६

कमी असलेले बेड : १५१४

परिमंडळ : ४

एकूण बेडची गरज = ५५५२

सध्याची बेडची क्षमता : १३०८

अतिरिक्त बेडची संख्या :  ४२४४

कमी असलेले बेड : ५५२

परिमंडळ : ५

एकूण बेडची गरज = ६९६२

सध्याची  बेडची क्षमता : ८९१

अतिरिक्त बेडची वाढ :  ६०७१

जास्त असलेले बेड : ११७३

परिमंडळ : ६

एकूण बेडची गरज = २७०६

सध्याची बेडची क्षमता : ९६०

अतिरिक्त बेडची संख्या:  १७४६

अधिक असलेले बेड : ००

परिमंडळ : ७

एकूण बेडची गरज  : १६७७

सध्याची बेडची क्षमता : ५४०

अतिरिक्त बेडची संख्या वाढ :  ११३७

अधिक बेड : ००

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -