काँग्रेस कार्यकर्त्यांसह राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखल

Rahul Gandhi entered the ED office along with Congress workers

नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर आज राहुल गांधी यांचा जबाब ईडीपुढे नोदवला जाणार आहे. या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. देशभरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांसह राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखल झाले. काँग्रेसचे बडे नेत या मोर्चात सहभागी झाले आहेत.

राहुल गांधींच्या घरासमोर पोस्टर –

महाराष्ट्र काँग्रेसनेही ईडी विरोधात जोरदार आंदोलन केले आहे.सुनो तानाशाहा, तोतों से डरा न पाओगे तुम हाथकंडों से हमें झुका ना पाओगे असे म्हणत भाजपविरोधी घोषणाबाजी केली . नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज ईडीसमोर जबाब नोंवण्यासाठी दाखल झाले आहेत. या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर एक पोस्टर लावले आहे. हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर सत्य झुकेगा नही असे! लिहले आहे.

पोलिसांनी नाकारली होती परवानगी –

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आज अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले आहेत. ईडी कारवायांविरोधात काँग्रेस नेत्यांनी आज काँग्रेस मुख्यालयापासून एपीजे अब्दुल कलाम रोडवरील ईडी मुख्यालयापर्यंत रॅली काढली. मात्र, दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या रॅलीला परवानगी नाकारली आहे. दिल्ली पोलिसांकडून रॅलीला परवानगी न देण्यामागे कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगितले होते. दरम्यान दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.