घरदेश-विदेश'राहुल गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे'; अशोक चव्हाण यांचे निवेदन

‘राहुल गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे’; अशोक चव्हाण यांचे निवेदन

Subscribe

काँग्रेस पक्षाची धुरा कोण सांभाळणार यावर राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी हे पक्षाचे नेतृत्व करू शकतात, त्यांनीच ते करावे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आज दुपारी ११ वाजता काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी पदाचा राजीनामा देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच अशोक चव्हाण यांनी अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. यासंबंधीचे निवेदन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले अशोक चव्हाण

काँग्रेस पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच पक्षाची पुढील वाटचाल झाली पाहिजे. सक्षम, संयमी व संवेदनशील नेते असलेल्या राहुल गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे. भारताची एकता, अखंडता तसेच प्रगतीमध्ये नेहरू-गांधी कुटुंबाने दिलेले योगदान अपूर्व आहे. देश व काँग्रेस पक्ष संघटित ठेवण्यासाठी पुढील काळातही त्यांच्या सक्रिय नेतृत्वाची नितांत गरज आहे. पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच पक्षाची पुढील वाटचाल झाली पाहिजे, असे मत त्यांनी निवेदनात व्यक्त केले आहे.

हेही वाचा –

माय लॉर्ड! चूकभूल द्यावी घ्यावी; ‘सामना’ अग्रलेखातून मांडले मंदिराचे अर्थकारण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -