घरमुंबईआदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला गळती; अमेय घोले नंतर 'या'ने सोडला ग्रुप

आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला गळती; अमेय घोले नंतर ‘या’ने सोडला ग्रुप

Subscribe

 

मुंबईः आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील युवा सेनेला लागलेली गळती काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे अमेय घोले नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटात सामील झाले आहेत. घोले यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी युवा सेनेचा कोअर कमिटीचा ग्रुप सोडला आहे. राहुल कनाल हेही युवा सेना सोडणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

- Advertisement -

कोअर कमिटी ग्रुप हा युवा सेनेचा कणा मानला जातो. या ग्रुपमधील सदस्य हे आदित्य ठाकरे यांचे अगदी जवळचे आहेत. या ग्रुपला गळती लागल्याने ठाकरेंची चिंता वाढली आहे. राहुल कनाल यांनी कोअर कमिटीचा ग्रुप सोडल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राहुल कनाल हे उद्योजक आहेत. ते युवा सेनेचे सक्रिय पदाधिकारी आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना राहुल कनाल हे शिर्डी देवस्थान समितीचे सदस्य राहिले आहेत. ते मुंबई महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक होते. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ते इच्छूक आहेत.

अभिनेता सलमान खान, क्रिकेटपटू विरोट कोहलीसोबत राहुल कनाल यांचे संबंध आहेत. ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे आहेत. आदित्य ठाकरे राज्याच्या राजकारणात असतात. इतर युवा सेना पदाधिकाऱ्यांनी पक्षात ढवळा ढवळ केल्यानेच राहुल कनाल हे आदित्य ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच कारणामुळे त्यांना कोअर कमिटीचा ग्रुप सोडल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

आयकर विभागाने राहुल कनाल यांच्या घरावर छापा मारला होता. तेव्हा त्यांना काहीच सापडले नाही. दिशा सॅलियन आणि सुशांतसिंग राजपूत यांच्याशी कनाल यांचे संबंध होते, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला होता. कोअर कमिटीचा ग्रुप सोडल्यानंतर ठाकरे कुटुंबियांनी कनालची समजूत काढल्याचे वृत्त आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरेंसोबत असलेल्या निष्ठावंतांनी शिवसेनेसोबत फारकत घेतली. नंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही शिंदे यांनाच दिलं. त्यामुळे ठाकरे गटाला अधिकच गळती लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -