घरताज्या घडामोडीमहापालिकेतील सचिन वाझे कोण?, आमदार राहुल नार्वेकर यांचा सवाल

महापालिकेतील सचिन वाझे कोण?, आमदार राहुल नार्वेकर यांचा सवाल

Subscribe

महापालिकेतील कामाची निविदा काढताना १२९ कोटी रुपयांचा खर्च दाखविण्यात आला.

मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाराचे आरोप करण्यात येत आहेत. नालेसफाईच्या कामात मोठा भ्रष्टाचा झाला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तर आता मुंबई महानगरपालिकेत अधिक रुपयांच्या निविदा काढून भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचे आमदार राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहून मुंबई महापालिकेतील सचिन वाझे कोण असा सवाल केला आहे. मुंबई महापालिकेतील एका कामाची निविदा काढताना १२९ कोटी रुपयांचे काम दाखविले. मात्र प्रत्यक्षात नंतर हेच काम ५०० कोटींवर नेऊन ठेवण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद असून असे काम करणारा महापालिकेतील हा ‘सचिन वाझे’ कोण? असा सवाल भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना एका पत्राद्वारे विचारला आहे.

राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत. महापालिकेतील कामाची निविदा काढताना १२९ कोटी रुपयांचा खर्च दाखविण्यात आला. मात्र नंतर वाढीव काम दाखवत हाच खर्च ५०० कोटींवर नेण्यात आला. खर्च वाढल्यास इतर कामांच्या निविदा न काढता रकमेतील निधीमध्ये फेरफार केला आहे का? हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून यात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होत आहे, असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

जनतेच्या पैशांचा चुराडा होत असताना नुसते बघत राहणारी मुंबईकर जनता एवढी दुधखुळी नाही, संबंधित प्रकरणाची चौकशी करा आणि जो कोणी पालिकेतील ‘सचिन वाझे’ आहे, त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणीही राहुल नार्वेकर यांनी केली आहे.


हेही वाचा :  परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस – खासदार राऊतांनी दिली माहिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -