घरमुंबईतक्रारदार तरुणीला सोशल मीडियावरून हद्दपार करा; राहुल शेवाळेंची हायकोर्टात याचिका

तक्रारदार तरुणीला सोशल मीडियावरून हद्दपार करा; राहुल शेवाळेंची हायकोर्टात याचिका

Subscribe

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे दिशा सालियन आत्महत्येशी नाव जोडल्यानंतर खासदार शेवाळे यांच्यावर एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. त्यावरून आरोपप्रत्यारोप सुरु झाले. आरोप करणाऱ्या तरुणीचे दाऊदशी संबंध आहेत. त्यामुळे तिची राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशी करावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली.

मुंबईः लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या तरुणीला सोशल मिडियावरून हद्दपार करा, अशी मागणी करणारी याचिका शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर येत्या काही दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

तक्रारदार तरुणी सोशल मिडियावर खालच्या पातळीवर जाऊन माझ्याविरोधात टीका करते. अशी टीका करुन माझी राजकीय कारकिर्द संपवण्याचा हा कट आहे. त्यामुळे त्या तरुणीचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्यात यावे. माझ्याबद्दल कोणतीही पोस्ट टाकण्यास त्या तरुणीला मनाई करण्यात यावी. याचिकेवर निकाल लागेपर्यंत तरुणीचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्यात यावे, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी याचिकेत केली आहे.

- Advertisement -

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे दिशा सालियन आत्महत्येशी नाव जोडल्यानंतर खासदार शेवाळे यांच्यावर एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. त्यावरून आरोपप्रत्यारोप सुरु झाले. आरोप करणाऱ्या तरुणीचे दाऊदशी संबंध आहेत. त्यामुळे तिची राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशी करावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली.

याला तरुणीने सोशल मिडियावर पोस्ट टाकत उत्तर दिले. मी दुबईची आहे. मी फॅशन डिझायनर आहे. मी अथक परिश्रम करुन करिअर केले आहे. मी दुबईची असल्याने अनेक देशात माझे मित्र आहेत. पाकिस्तान असो की बांगलादेश तेथील माझे मित्र आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी माझ्यावर तथ्यहिन आरोप केले आहेत, असा दावा पीडित मुलीने केला आहे.

- Advertisement -

राहुल शेवाळे मला भेटायला दुबईत येत होते. त्यानंतर ते कोणत्या कोणत्या देशात जात होते याचा तपास एनआयएने करावा. त्यांच्या विमान प्रवासाच्या तपशीलातून सर्व सत्य समोर येईल. ते पाकिस्तान, कराची व अन्य कुठे कुठे गेले होते याची माहिती एनआयएने घ्यावी. त्यांचे कुठे कुठे व्यवसाय आहेत. हाॅटेल व रिअल ईस्टेटचे व्यवसाय कुठे कुठे आहेत. त्यांना पैसे कुठुन मिळतात, हे एनआयएने तपासावे, अशी मागणी पीडित मुलीने केली.

आता तर खासदार शेवाळे यांनी तक्रारदार तरुणीचे सोशल अकाऊंटच बंद करण्याची मागणी केली आहे. न्यायालय यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -