घरक्राइमझवेरी बाजारात 'Special 26', बोगस ईडी अधिकाऱ्यांनी छापेमारी करत लुटले 1.7 कोटी

झवेरी बाजारात ‘Special 26’, बोगस ईडी अधिकाऱ्यांनी छापेमारी करत लुटले 1.7 कोटी

Subscribe

'Special 26' या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मुंबईतील झवेरी बाजारात बोगस ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. छापेमारी करत बोगस अधिकाऱ्यांनी तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये लुटल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

‘Special 26’ या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मुंबईतील झवेरी बाजारात बोगस ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. छापेमारी करत बोगस अधिकाऱ्यांनी तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये लुटल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Raid By Bogus Ed Officers In Zaveri Bazar Mumbai 1.7 Crore Stolen)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील झवेरी बाजारातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर 4 अज्ञात लोकांनी आपण ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत छापेमारी केली. या छापेमारीत त्यांनी २५ लाख रुपये रोख आणि ३ किलो सोनं लुटले. तसेच, लुटलेल्या सोन्याची एकूण किंमत 1 कोटी 70 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी 4 अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 394, 506 (2) आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या छापेमारीनंतर इडीचे अधिकारी हे बोगस असल्याचे समजताच व्यावसायिकाने लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या दुकानात आणि परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेज तपासले. सध्या या फुटेजच्या मदतीने पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील नागपाड्यात शाळेच्या मुख्याध्यापकाने केला अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -