जोगेश्वरीत हुक्का पार्लरवर छापा, मालकासह ९७ जणांवर कारवाई!

जोगेश्वरीमध्ये पबवर कारवाई

जोगेश्वरीतील ‘बॉम्बे ब्रुट’ पब मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्टीवर रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या पोलिसानी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी ९७ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मुले मुली, तृतीयपंथ मिळून आले आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार जोगेश्वरी पश्चिम या ठिकाणी असलेल्या बॉम्बे ब्रुट ‘द मुघल शिशा’ हा पब आतून सुरू असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी पार्टी करीत असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली. ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी पोलीस पथकासह रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता या पब मध्ये मोठ्या प्रमाणात हुक्का आणि मद्यपार्टी सुरू होती, पोलिसांनी ६५  ग्राहक आणि व्यवस्थापकसह ३२ कर्माचरी असे एकूण ९७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात तृतीयपंथी आणि तरुणीचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बांगर यांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या ९७जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांना जामिनावर सोडण्यात आले असल्याचे बांगर यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात चार वेळा या पबवर कारवाई करण्यात आली होती, तसेच लॉकडाऊन शिथिल होताच पब मालक ग्राहकांना फोन करून पब सुरू असल्याचे सांगून ग्राहकांना बोलावून घेतले आणि बंद शटरच्या आत मध्ये हुक्का आणि मद्य पार्टी सुरू ठेवली होती अशी माहिती बांगर यांनी दिली. पब मालक इम्रान हा फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.


हे ही वाचा – भाजपवर फेसबुकची कृपा, नेत्यांच्या हिंसा भडकावणाऱ्या पोस्टवर कारवाईस नकार