घरमुंबईमागील वर्षाच्या तुलनेत २१ कोटींची वाढ

मागील वर्षाच्या तुलनेत २१ कोटींची वाढ

Subscribe

रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प

रायगड जिल्हा परिषदेचा 71 कोटी 76 लाख रुपये खर्चाचा मूळ अर्थसंकल्प अर्थ सभापती अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी गुरुवारी सादर केला. 2018-19 वर्षात सादर केलेल्या मूळ अर्थसंकल्पापेक्षा या अर्थसंकल्पात 21 कोटी 19 लाख 20 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाचे सत्ताधार्‍यांसह विरोधी सदस्यांनीही कौतुक केले.

रायगड जिल्हा परिषदेच्या स्व. नारायण नागू पाटील सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी दिलीप हळदे, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे, शिक्षण आणि आरोग्य सभापती नरेश पाटील, समाजकल्याण सभापती नारायण डामसे, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती प्रमोद पाटील यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

या अर्थसंकल्पात इमारती व दळणवळण यंत्रनेसाठी 22 कोटी 71 लाख 70 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर सामान्य प्रशासन 74 लाख 80 हजार, शिक्षण 2 कोटी 25 लाख, पाटबंधारे 1 कोटी, सार्वजनिक आरोग्य 1 कोटी 75 लाख, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी 10 कोटी 40 लाख, कृषी 1 कोटी, पशुसंवर्धन 75 लाख, समाजकल्याण 9 कोटी 40 लाख, अपंगकल्याण 2 कोटी 35 लाख, सामूहिक विकास 4 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील विशेष तरतूद

* नैसर्गिक आपत्तीत तातडीचे रस्ते व इतर दुरुस्ती करणे – 25 लाख
* जिल्हा परिषद जागेवर व्यापारी संकुल व मंगलकार्यालय बांधणे – 1 कोटी
* जलसिंचन व पाझर तलाव दुरुस्ती – 40 लाख
* जिल्हास्तरीय आरोग्य मेळावे – 25 लाख
* जिल्ह्यातील रुग्णांसाठी डायलेसीस सेंटर उभारणे – 50 लाख
* ग्रामीण पणीपुरवठा योजना व देखभाल दुरुस्ती – 10 कोटी 40 लाख
* शेती विषयक अवजारे 50 टक्के अनुदानाने पुरविणे – 37 लाख
* अपंग बचतगटांना अनुदान व स्वयंरोजगारासाठी भांडी पुरविणे – 25 लाख
* दिव्यांग व्यक्तिंचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे – 10 लाख
* अंगणवाडीत कुपोषित बालकांना खाऊ वाटप करणे – 15 लाख
* उंबरखिंड येथे शौर्यभूमी विकसित करणे – 10 लाख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -