घरताज्या घडामोडीबहुजन क्रांती मोर्चाचा भारत बंद, रेलरोकोमुळे मुंबईकर वेठीला!

बहुजन क्रांती मोर्चाचा भारत बंद, रेलरोकोमुळे मुंबईकर वेठीला!

Subscribe

सीएए कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर रेलरोको केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रेल्वेचा खोळंबा झाला.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) याविरोधात आंदोलन करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा या संघटनेने आज २९ जानेवारी रोजी भारत बंदची हाक दिली होती. मात्र, इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा आंदोलकांनी पहिलं टार्गेट केलं ते मुंबईच्या लोकलला. मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर सकाळी ८.३० च्या सुमारास मोठ्या संख्येनं आंदोलक जमा झाले. प्रारंभी ते फक्त प्लॅटफॉर्मवर उभं राहून घोषणा देत होते. मात्र, पुढे त्यांनी थेट ट्रॅकवर उतरायला सुरुवात केली. जवळपास अर्धा तास आंदोलकांनी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर उतरून गोंधळ घातला. यानंतर आरपीएफच्या जवानांनी त्यांना ट्रॅकवरून बाजूला करत रेल्वे पुन्हा सुरू केली. पण इतका वेळ रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. त्याचा परिणाम म्हणून मध्य रेल्वेवर वाहतूक किमान १५ चे २० मिनिटे उशिराने सुरू राहिली. ज्या वेळी मुंबईकर कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडतात, किंवा शेकडो मुंबईकर रेल्वेमध्येच असतात, नेमक्या त्याच वेळी हा रेलरोको झाल्यामुळे मुंबईकरांना मनस्तापाचा सामना करावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -