घरमुंबईरात्री उशिरा विशेष लोकल सोडण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय, जयंत पाटलांच्या मागणीला यश

रात्री उशिरा विशेष लोकल सोडण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय, जयंत पाटलांच्या मागणीला यश

Subscribe

मुंबई – गणेश उत्सवाच्या काळात रात्री उशिरा दर्शन घेऊन परतणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्यसरकारने केंद्राशी चर्चा करून शेवटच्या लोकलनंतर रात्री उशिरा काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरू ठेवाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. या मागणीला यश आले असून शेवटच्या लोकलनंतर रात्री उशिरा काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर मंगळवारी मध्यरेल्वेने रात्री उशिरा लोकलच्या विशेष फेऱ्या मेन लाइन आणि हार्बर लाइनवरून चालवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात मध्यरेल्वेने ट्वीटरवरून वेळापत्रक जाहीर केले आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण आणि हार्बर मार्गावर दहा विशेष लोकल चालवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या ट्रेन सर्व स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत.कल्याणवरुन लोकल मध्यरात्री १२.०५ मिनिटांनी सुटेल आणि ती मध्यरात्री १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. तर दुसरी लोकल ठाण्यावरुन १ वाजता सुटेल ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पहाटे २ वाजता पोहोचेल. तिसरी लोकल ठाण्याहून मध्यरात्री २ वाजता निघेल ती ३ वाजता सीएसएमटीला पोहोचेल असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -