Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई थरारक पाठलाग करत मोबाईल चोराला रेल्वे पोलिसांनी पकडले

थरारक पाठलाग करत मोबाईल चोराला रेल्वे पोलिसांनी पकडले

Related Story

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कर्तव्यांवर असलेले रेल्वे पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून थरारक पाठलाग करत एका अट्टल मोबाईल चोराला जेरबंद करण्यात आले आहे. शकील अहमद नासिर अहमद शेख असे या चोरट्यांचे नाव असून तो कुरेशी मोहल्ला गोवंडी येथे राहतो. पोलिसांनी त्यांच्याकडून एक रामपुरी चाकू आणि  १४ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जप्त केला आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीएसएमटी रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७/ ८ वर दुपारी १२ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास, एका प्रवाशाचा मोबाइल चोरीला गेला आणि काही प्रवाशांनी आरडाओरडा केली असता त्यांच्या आवाजावरून  कर्तव्यांवर असलेले उपनिरीक्षक युनूस खान आणि आरपीएफ कॉन्स्टेबल किरण कुमार रामराजे,   जीआरपी कॉन्स्टेबल टकले हे सतर्क झाले. रेल्वे पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून  रेल्वे रुळावर उडी घेतलेल्या चोराचा त्यांनी पाठलाग केला. त्या अज्ञात व्यक्तीने चाकू काढून कर्मचार्याांना मारण्याचा प्रयत्न केला पण कर्मचार्याोंनी काळजीपूर्वक त्याला पकडले आणि पुढील कारवाईसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील जीआरपी पोलीस स्टेशनला स्वाधीन केले. त्याने आपले नाव शकील अहमद नासिर अहमद शेख वय वर्षे २४ राहणार कुरेशी मोहल्ला, गोवंडी असे सांगितले.  त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या ताब्यात असलेला एक रामपुरी चाकू आणि  १४ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जीआरपीला सापडला. मोबाईलचा मालक विजय अशोक पाटील यांनी फिर्याद नोंदविली आणि चोरट्याला आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.

- Advertisement -