रेल्वे पोलिसांना मिळणार १६० निवासस्थाने – मुख्यमंत्री

लोहमार्ग पोलीसांसाठी १६० शासकीय निवासस्थाने येत्या १ फेब्रुवारी रोजी हस्तांतरीत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. घाटकोपर येथील पोलीस परेड मैदानावर लोहमार्ग पोलीसांमार्फत आयोजित मुंबई वार्षिक मेळावा २०१९ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

government will help farmers of 50 thousand crores rupees-devendra fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासनामार्फत पोलीसांसाठी घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात येत आहे. पोलीसांसाठी चांगल्या दर्जाच्या सदनिका देण्याबरोबरच पोलीसांना स्वतःच्या हक्काची घरे मिळावीत यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. या माध्यमातून नजिकच्या काळात सर्वच पोलीसांना स्वमालकीची घरे मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लोहमार्ग पोलीसांसाठी १६० शासकीय निवासस्थाने येत्या १ फेब्रुवारी रोजी हस्तांतरीत करण्याची घोषणाही त्यांनी केली. घाटकोपर येथील पोलीस परेड मैदानावर लोहमार्ग पोलीसांमार्फत आयोजित मुंबई वार्षिक मेळावा २०१९ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या निर्णयामुळे आता लोहमार्ग पोलिसांना दिलासा मिळणार आहे.

काय म्हणाले फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पोलीस मुख्यालयाचा स्मार्ट सिटी योजनेतून विकास करण्यात येईल. शहराच्या रक्षणासाठी पोलीस अहोरात्र मेहनत करतात. लोहमार्ग पोलीसांना तर नेहमीच तत्पर रहावे लागते. लोहमार्ग पोलीसांसाठी १६० शासकीय निवासस्थाने येत्या १ फेब्रुवारी रोजी हस्तांतरीत करण्यात येणार आहे.”

आयुक्तालयाचे केले अभिनंदन

दिवस रात्र मेहनत करणाऱ्या लोहमार्ग पोलीसांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित केलेल्या मुंबई वार्षिक मेळावा कार्यक्रमाबद्दल त्यांनी आयुक्तालयाचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मकरसंक्रांती निमित्त सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कलाकारांमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.