घरमुंबईरेल्वेची जनजागृती फळाला, तिकीट अ‍ॅपला उत्स्फूर्त प्रतिसाद

रेल्वेची जनजागृती फळाला, तिकीट अ‍ॅपला उत्स्फूर्त प्रतिसाद

Subscribe

मुंबईतील रेल्वे तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी रेल्वेने यूटीएस मोबाईल अ‍ॅप सुरू केले. मात्र या अ‍ॅपला मुंबईकरांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे रेल्वेने जनजागृती मोहीम हाती घेतली.

मुंबईतील रेल्वे तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी रेल्वेने यूटीएस मोबाईल अ‍ॅप सुरू केले. मात्र या अ‍ॅपला मुंबईकरांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे रेल्वेने जनजागृती मोहीम हाती घेतली. त्यानंतर या अ‍ॅपची माहिती प्रवाशांना होऊ लागली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सुरुवात केली. परिणामी सोमवारी तब्बल १ हजार ३३ प्रवाशांनी या अ‍ॅपचे रिचार्ज केले.

रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने २०१५ मध्ये यूटीएस मोबाईल अ‍ॅप प्रवाशांच्या सेवेत आणले. हे अ‍ॅप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमकडून (सीआरआइएस) बनवण्यात आले होते. अनारक्षित तिकिटासाठी असलेले हे अ‍ॅप रेल्वेने प्लेस्टोरच्या माध्यमातून मोबाईलवर उपलब्धही करून दिले. मात्र गत दोन वर्षात प्रवाशांनी या अ‍ॅपकडे पाठ फिरवल्याने त्याला फारच कमी प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे रेल्वे बोर्डाने अ‍ॅपबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. रेल्वेकडून प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अ‍ॅपसंदर्भात माहिती देण्यास सुरुवात केली. या मोहिमेला यश मिळून अवघ्या काही दिवसांतच अ‍ॅपच्या वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी यूटीएस मोबाईल अ‍ॅपच्या वापरकर्त्यांकडून तब्बल २५ हजार ६३० तिकीटे अ‍ॅपच्या माध्यमातून काढण्यात आली. तर १ हजार ३३ प्रवाशांनी यूटीएस अ‍ॅपचे रिचार्ज केले. त्यामुळे आता मुंबईच्या रेल्वे तिकीट खिडक्यांची गर्दी नक्कीच कमी होणार अशी अशा रेल्वे अधिकार्‍यांनी वर्तवली आहे.

वापरकर्त्यांना ५ टक्के बोनस

यूटीएस मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करताना प्रवाशांना एक आयडी क्रमांक मिळतो. त्याच्या माध्यमातून प्रवाशी सोप्या पद्धतीने पेपरलेस व अनारक्षित तिकीट काढू शकतात. प्रत्येक रेल्वे स्थानकावर तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेने क्यूआर कोड उपलब्ध करून दिला आहे. यूटीएस मोबाईल अ‍ॅप वापरकर्त्यांना रेल्वेकडून ५ टक्के बोनस मिळणार आहे.

दोन वर्षांपूर्वी रेल्वेने यूटीएस अ‍ॅप सुरू केला आहे. अ‍ॅपविषयी जनजागृती मोहीम सुरू केल्यानंतर अ‍ॅपच्या वापरकर्त्यांमध्ये वाढ झाली आहे. यूटीएस अ‍ॅपमुळे रेल्वे तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी नक्कीच कमी होईल.
– डी. डी. पवार, मुख्य तिकीट बुकिंग परिवेक्षक, मध्य रेल्वे

- Advertisement -

युटीएसची सोमवारी विक्रमी नोंद
२५ हजार ६३० तिकीट विक्री
१ हजार ३३ युजर्सकडून रिचार्ज
चेंबूर स्थानकावर सर्वाधिक रिचार्ज २९४

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -