घरमुंबईरेल्वे हद्दीतील ४४५ पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

रेल्वे हद्दीतील ४४५ पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

Subscribe

अंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर पालिका आणि रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आली असून, उद्या शुक्रवारपासून रेल्वे हद्दीतील सर्व ४४५ पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम हाती घेतले जाणार आहे. आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासोबत रेल्वे अधिका-यांची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. ऑडिटकरुन पुलांचा अहवाल लकरच सादर केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अंधेरी आणि विलेपार्लेला जोडणारा गोखले पूल मंगळवारी अचानक कोसळला. यामध्ये 5 जण 5 जण जखमी झाले. या घटनेनंतर पालिका-रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात सर्व पातऴीवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पुलाची जबाबदारी कुणाची यावरून वादही रंगला. यावरून सर्वोच्च न्यायालय़ाने फटकारल्यानंतर पालिका- रेल्वे प्रशासन कामाला लागली आहे. आज महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात पालिका – रेल्वे प्रशासन यांची विशेष बैठक झाली. आयुक्तांसोबत झालेल्या या बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन; पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांच्यासह मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अभियंता पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्या दरम्यान अधिक प्रभावी समन्वयन साधण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्या हद्दीमध्ये आरओबी, एफओबी, स्काय-वॉक इत्यादी प्रकारचे ४४५ पूल आहेत. या पूलांची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) उद्या शुक्रवार, 6 जुलैपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एकूण १२ चमू गठीत करण्यात आल्या आहेत. या चमूंमध्ये भारतीय प्रोद्योगिकी संस्थान (आय आय टी, मुंबई) येथील तज्ञ, संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंता व महापालिकेच्याही तज्ज्ञ अभियंत्यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -