घरताज्या घडामोडीवादळी वाऱ्यामुळे हार्बर लाईन विस्कळीत

वादळी वाऱ्यामुळे हार्बर लाईन विस्कळीत

Subscribe

अचानक पाऊस सुरु झाल्याने ओव्हर हेड वायर्सचे घर्षण होऊन स्पार्किंग सुरु झाले त्यामुळे हार्बर मार्गावरील अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली.

गुरुवारी मुंबईतील अनेक भागात अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील अनेक भागात मोठे नुकसान झालेले पहायला मिळाले. वादळी वाऱ्यामुळे हार्बर लाईन विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर्समध्ये घर्षण होऊन अनेक ठिकाणी स्पार्किंग सुरु झाले आहे. त्यामुळे वाशी पासून पुढील काही स्थानकात वाहतूक विस्कळीत झाले आहे. वाशी ते पनवेल स्थानकादरम्यान अनेक लोकल उभ्या आहेत. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला पहायला मिळत आहे. रेल्वे प्रशानाकडून मात्र अद्याप याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. हार्बरच्या मानसरोवर स्थानकात ओव्हर हेड वायर्समध्ये काही तांत्रिक कारणांमुळे बिघाड आला होता. अचानक पाऊस सुरु झाल्याने ओव्हर हेड वायर्सचे घर्षण होऊन स्पार्किंग सुरु झाले त्यामुळे हार्बर मार्गावरील अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली.

हार्बर लाईनवर गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून लोकल ठप्प झाल्या होत्या. मात्र पुढील एका तासातच हा बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. त्यानंतर हार्बरवरील वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मात्र लोकल गाड्या या जवळपास अर्धातास उशिराने धावत आहेत. ठप्प झालेल्या लोकलमुळे प्रवाशांचे मोठा खोळंबा झाला. हार्बर लाईनच्या सर्व स्थानकांवर प्रवशांची मोठी गर्दीही पहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्य सरकारचा मोठा निर्णय, SRA योजनेतील घरे 5 वर्षांनी विकण्यास मुभा

 

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -