घरमुंबईसमुद्रात एकाच वेळी दोन वादळ, मुंबईसह पुण्यात आज पाऊस?

समुद्रात एकाच वेळी दोन वादळ, मुंबईसह पुण्यात आज पाऊस?

Subscribe

अरबी समुद्रामध्ये आगामी 24 तासांत ‘पवन’ आणि ‘अम्फन’ ही दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, पुणे व नाशिक या प्रमुख शहरांसह उर्वरीत महाराष्ट्रात उद्या (गुरूवारी) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ‘स्कायमेट’कडून तसे सांगण्यात आले आहे.

चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या अगोदर ‘क्यार’ या चक्रीवादळाने अरबी समुद्रात ज्याप्रमाणे स्थिती निर्माण केली होती, त्याचप्रमाणे सध्या समुद्रात स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती होणे ही परिस्थिती दुर्मिळ मानली जाते. माध्यमांमधील माहितीनुसार ‘अम्फन’ चक्रीवादळ हे पूर्व-मध्य अरबी समुद्रात येण्याची शक्यता आहे, या वादळाचा परिणाम मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासह गोवा आणि दक्षिण गुजरातच्या भागांत दिसू शकतो.

- Advertisement -

तर, पवन चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने मार्गक्रमण करणार असून, ते अगोदर उत्तर पश्चिम आणि त्यानंतर पश्चिम दिशेने पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान वार्‍याचा वेग हा प्रतितास 40 ते 50 किलोमीटर राहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अम्फन चक्रीवादळ हे पूर्व-मध्य अरबी समुद्रात येण्याची शक्यता आहे, या वादळाचा परिणाम मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासह गोवा आणि दक्षिण गुजरातच्या भागांत दिसू शकतो. तर, पवन चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने मार्गक्रमण करणार असून, ते अगोदर उत्तर पश्चिम आणि त्यानंतर पश्चिम दिशेने पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान वार्‍याचा वेग हा प्रतितास 40 ते 50 किलोमीटर राहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -