घरमुंबईढगांचा ढोल घुमला, मिरवणुकीतला थंडावला!

ढगांचा ढोल घुमला, मिरवणुकीतला थंडावला!

Subscribe

 मुंबईसह राज्यात पावसाचा धुमाकूळ

मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे गौरी-गणपती विसर्जनाच्या गणेशभक्तांच्या उत्साहावर पाणी फेरले. अनेक गणेशभक्तांनी अत्यंत साधेपणाने लाडक्या बाप्पाचे विसर्जन आटोपते घेतले. ढगांचा ढोल घुमून जोरदार पाऊस पडल्यामुळे विसर्जन मिवरणुकीतील ढोल मात्र थंडावल्याचे सगळीकडे दिसत होते.

मुंबईसह राज्यात शनिवारी पुन्हा एकदा वरुणराजाने मुंबईसह उपनगरातील काही भागाला झोडपून काढले. मुंबईसह ठाणे आणि पश्चिम उपनगरासह राज्यातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, परभणी आणि सातारा याठिकाणीदेखील जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत दुपारपासून सुरु झालेल्या पावसामुळे हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन, दादर आणि गोरेगाव अशा अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने काही काळ वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले होते.

- Advertisement -

मुंबईसह राज्यात शनिवारी गौरी-गणपती विसर्जनाला पावसाने झोडपले. शनिवारी दुपारपासून सुरु झालेल्या या पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. यात प्रामुख्याने सायन, किंग्ज सर्कल, दादर, हिंदमाता आणि गोरेगाव या भागात पाणी साचले. पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, गोरेगाव परिसरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारनंतर पावसाने जोर पकडला. या पावसामुळे ठाणे, पालघर, कोकण आणि राज्यातील इतर भागांत त्रेधातिरपीट उडविली. विशेष म्हणजे, शनिवारी गौरी गणपती विसर्जन असल्याने अनेक गणेशभक्तांनी पाऊस जाण्यासाठी वाट बघून बसले होते. संध्याकाळी पावसाच्या जोर कमी झाल्यानंतर अनेकांनी आपले विसर्जन सोहळे पार पडले. दरम्यान, दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने अनेकांनी अत्यंत साधेपणाने मुंबईतील दादर, जुहू, गिरगाव आणि विक्रोळी परिसरात विसर्जन पार पाडले. या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नसला तरी रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

पालघर, कोकणात जोरदार पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारीही अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. यात प्रामुख्याने पालघर, ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मुंबईतही काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्याचप्रमाणे कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि कोल्हापूरातही पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातही पावसाची हजेरी
ठाणे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली असून, ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाण्यात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. कोलशेत, ब्रह्मान्ड, घोडबंदर रोड परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. भाईंदर, वसई, विरार पट्ट्यातही मुसळधार पाऊस पडत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -