Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई धो धो पावसाने दाखवली झलक!

धो धो पावसाने दाखवली झलक!

Related Story

- Advertisement -

केरळात मान्सून दाखल झाल्यापासून देशात अनेक ठिकाणी मान्सूनच्या पावसाने जोर धरला असून मागील दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्रात दक्षिणेत मान्सूनच्या पावसाने तर उत्तरेत पूर्व मोसमी पावसाने जबरदस्त तडाखा दिला आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि कोकणात बुधवारपासून चार दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा असताना त्याची झलक मंगळवारी बघायला मिळाली. सकाळपासून पावसाला धीम्या गतीने सुरुवात झाली होती. मात्र, नऊनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मुंबई शहर आणि उपनगरात दोन एक तासांत वातावरणात थंडावा आला. याचवेळी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये बर्‍याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

चार दिवस होणार्‍या अतिवृष्टीमुळे मुंबईत पडझडीच्या घटना घडू शकतात. त्यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशाराही आपत्ती विभागाकडून देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील जीर्ण झालेल्या, मोडकळीस आलेल्या इमारती रिकाम्या करण्याचा आदेशही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. सध्या मान्सूनने पुण्यासह अलिबाग आणि रायगडपर्यंत मजल मारली असली तरी अद्याप मुंबईत मान्सूनचे आगमन झालेले नाही.

- Advertisement -

आज मुंबईसह राज्यात विविध जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे, तो पूर्व मोसमी पाऊस असल्याची माहिती हवामान विभागाचे संचालक जयंता सरकार टीटी यांनी दिली आहे. महाराष्ट्रात नैऋत्य मौसमी वार्‍यांनी पुण्यापासून अलिबाग आणि रायगडपर्यंत धडक मारली आहे. तर 10 जूनपर्यंत मुंबईत मान्सून दाखल होणार असल्याची माहितीही जयंता सरकार यांच्याकडून देण्यात आली आहे.

मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर बुधवारपासून मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांनाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -